भाजपची चार वाजता पुन्हा बैठक; राज्यपालांच्या निमंत्रणाला आज उत्तर देणार

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड बैठकीसाठी उपस्थित होते.

Mumbai
sudhir mungantiwar
सुधीर मुनगंटीवार

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली असून संध्याकाळ चार वाजता पुन्हा एकदा बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निमंत्रणाला उत्तर दिले जाईल, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. कोअर कमिटीची बैठक संपन्न झाल्यानंतर वर्षा बंगल्याबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत माहिती दिली. या बैठकीला भाजपचे सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते.


हेही वाचा – ठरलं, काँग्रेसचा शिवसेनेला पाठिंबा?


महाराष्ट्रात सर्वाधिक अशा १०५ जागांवर निवडून आल्यामुळे नियमानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला शनिवारी पत्र पाठवून सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. याच पार्श्वभूमीवर भाजच्या कोअर कमिटीची सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यपालांच्या निमंत्रणाला काय उत्तर द्यायचे? या विषयावर चर्चा होणार होती. आज सकाळी अकरा वाजेपासून या बैठकीला सुरुवात झाली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here