घरमुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला १३२ वर्षे पूर्ण

Subscribe

पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणांच्या यादीतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाचा समावेश होतो.

मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनसला आज १३२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपल्याला कायम या ठिकाणी गर्दींचा जमाव पाहायला मिळतो. एवढेच नव्हे तर, पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणाच्या यादीतही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाचा समावेश होतो. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त हे स्थानक बांधण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाची स्थापना १९८७ साली झाली. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत. महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

- Advertisement -

या रेल्वे स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात १८७८ झाली. तब्बल ९ वर्षांनी हे बांधकाम पूर्ण झाले. इमारत बांधण्यासाठी त्या काळचा लागणारा सर्वाधिक काळ आहे. या स्थानकाची रचना विल्यम स्टीव्हन्स यांनी केली आहे. रेल्वे स्थानक बांधण्यासाठी विल्यम यांना १६ लाख १४ रुपयांचे मानधन देण्यात आले होते. या रेल्वे स्थानकाला लंडनमधील सेंट पॅकर्स यासारखे तयार करण्यात आले आहे.

सीएसएमटी स्थानकात मागील वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे. २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे. दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे. त्याच्या परिणामी ही संख्या घटल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या स्थानकाला व्ही.टी म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर या स्थानकाचे नामंतर होऊन सी.एस.टी ठेवण्यात आले. पुन्हा या स्थानकाचे नावात बदल करण्यात आले. आता या स्टेशनला सी.एस.एम.टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे ओळखले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -