घरलाईफस्टाईलबनवा चटकदार ऑम्लेट करी

बनवा चटकदार ऑम्लेट करी

Subscribe

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गरमा- गरम खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी चटकदार ऑम्लेट करी हॉटेल मधून ऑर्डर करण्यापेक्षा घरच्या घरी नक्कीच ट्राय करून पहा. ऑम्लेट करी रेसिपी बनवण्याचे साहित्य आणि कृती पुढील प्रमाणे-

- Advertisement -

साहित्य

  • ४ अंडी
  • खोवलेला ओला नारळ अर्धी वाटी
  • १ चमचा धने
  • अर्धा चमचा जिरे
  • पाव चमचा काळी मिरी
  • पाव चमचा बडीशेप
  • बारीक चिरलेले २ कांदे
  • बारीक चिरलेला १ टोमॅटो
  • अर्धा किसलेला टोमॅटो
  • १ चमचा आले-लसूण वाटून
  • १ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा कसुरी मेथी
  • अर्धा चमचा किचनकिंग मसाला
  • मीठ

कृती 

नारळ, धने, जिरे, काळी मिरी, बडीशेप हे एकत्र गुळगुळीत वाटून घ्यावे. अंडी फेटून घ्यावी. त्यात थोडा चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मीठ घालून त्याचे ऑम्लेट बनवावे. ऑम्लेटचे चौकोनी तुकडे करावेत. एका भांडय़ात तेल गरम करावे. त्यात वाटलेले आले-लसूण, कांदा हे लालसर परतावे. मग त्यात किसलेला टोमॅटो घालावा. सर्व मसाले घालून थोडे पाणी घालावे आणि उकळायला ठेवावे. चांगले उकळल्यावर त्यात ऑम्लेटचे चौकोनी काप टाकून त्याला वाफ आणावी. गरमागरम भाताबरोबर चटकदार ऑम्लेट करी खाण्यास सर्व्ह करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -