घरमुंबईरॅगिंगच्या तक्रारी : कुपर १०, नायर ४ तर केईएममध्ये एक

रॅगिंगच्या तक्रारी : कुपर १०, नायर ४ तर केईएममध्ये एक

Subscribe

पालिकेच्याबा.य.ल. नायर हॉस्पिटलमध्ये चार जणांनी रँगिंगबाबतची तक्रार दाखल केल्याची माहिती अधिकारातून समोर आली असताना आता कुपर आणि केईएम हॉस्पिटलमध्येही रॅगिंग होत असल्याचे समजते आहे.

नायर हॉस्पिटलमधील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये होणारी रॅगिंग हा विषय पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. पण, रॅगिंग हा प्रकार अजूनही हॉस्पिटलमध्ये सुरू असल्याचं समोर‌ आलं आहे. पालिकेच्या बा.य.ल. नायर हॉस्पिटलमध्ये चार जणांनी रँगिंगबाबतची तक्रार दाखल केल्याची माहिती अधिकारातून समोर आली असताना आता कुपर आणि केईएम हॉस्पिटलमध्येही रॅगिंग होत असल्याचे समजते आहे. यातून सरकारी वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये रॅगिंगच्या तक्रारी त्या त्या वेळी दाखल झाल्याचेही समजते. तसेच आणखीही काही हॉस्पिटल्समधून माहिती येणे बाकी असल्याचे माहिती अधिकारात म्हटले आहे.

सरकारी महाविद्यालयांमध्ये बहुतांश रॅगिंगच्या तक्रारी आहेत. अद्याप काही हॉस्पिटलमधून माहिती येणं बाकी आहे. नायर, केईएम, कूपर हॉस्पिटलमधून माहिती मिळाली आहे. पण, या तक्रारीनंतर अॅन्टी रॅगिंग कमिटीकडून कारवाई होणे महत्वाचे आहे.
– शकील अहमद शेख, आरटीआय कार्यकर्ते

- Advertisement -

माहिती अधिकारातून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय म्हणजे कूपर हॉस्पिटलमध्ये दहा विद्यार्थ्यांविरोधात हॉस्पिटल प्रशासनाकडे रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.‌ माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी तक्रारींबाबत माहिती मागितली होती. गेल्या पाच वर्षात दहा विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तरी, २०१६ मध्ये रॅगिंग संदर्भात ५ विद्यार्थ्यांविरोधात शिस्तभंग वर्तणूक केल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. २०१८ मध्ये ५ विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या. चौकशी अंती २०१६ मध्ये या तक्रारींच्या अनुषंगाने ५ विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून ६ महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलं आहे.

२०१८ मध्ये या तक्रारींच्या अनुषंगाने ३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून ६ महिन्यांकरता निलंबित करण्यात आलं. पण, यावर कोणत्याही विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कूपर हॉस्पिटलमध्ये २०१५ पासून रॅगिंग विरोधी समितीच्या ११ बैठका झाल्या. तर, रॅगिंग प्रकरणी समितीने आतापर्यंत ८ विद्यार्थ्यांवर फक्त ६ महिन्यांकरता वसतिगृहातून निलंबनाची कारवाई केल्याचं समितीने या आरटीआयमध्ये म्हटलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -