घरमहाराष्ट्रअकारावीची पहिली यादी 95 टक्क्यांच्यावर?

अकारावीची पहिली यादी 95 टक्क्यांच्यावर?

Subscribe

राज्य मंडळाचा दहावीचा घसरलेला निकाल, मराठा आरक्षण, संवर्णातील आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाला मिळालेला अल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर 12 जुलैला अकरावीची पहिली यादी जाहीर होत आहे. परंतु 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या आयसीएसई व सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याने नामांकित कॉलेजमधील अकरावीची पहिली यादी ही 95 टक्क्यांपेक्षा अधिक लागण्याची शक्यता शिक्षणतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

अंतर्गत मूल्यमापनाचे गुण कमी केल्याने दहावीचा घरसलेला निर्णय आणि सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांमध्ये 95 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्य अधिक आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नामांकित कॉलेजमधील प्रवेशाचा मार्ग खडतर झाला होता. या पार्श्वभूमीर शिक्षण विभागाने नामांकित कॉलेजमधील जागा वाढवण्याचा निर्णय घेत विद्यार्थी व पालकांना दिलासा दिला. असे असले तरी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 95 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल एक हजार 487 इतकी आहे. यामध्येही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आयसीएसई व सीबीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज अधिक आहेत.

- Advertisement -

आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांचे 756, सीबीएसई 425 तर एसएससीचे फक्त 301 विद्यार्थी आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेजमधील पहिली यादी 95 टक्क्यांच्यावर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एसएससीच्या विद्यार्थ्यांचा सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यामुळे मार्ग खडतर असणार आहे. राज्य सरकारने नामांकित कॉलेजमध्ये 10 टक्के अतिरिक्त जागा वाढवल्या असल्या तरी त्याचा सर्वाधिक फायदा हा अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अधिक होण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.

त्याचप्रमाणे मुंबई विभागातून 90 ते 94.55 टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 13 हजार 214 इतकी आहे. त्यामुळे अन्य कॉलेजमध्येही प्रवेशामध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

95 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या
मंडळ -विद्यार्थी
एसएससी -301
सीबीएसई -425
आयसीएसई -756
आयजीसीएसई -5
एकूण -1487

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -