घरमुंबईमालाड भिंत दुर्घटनेत ३० वा बळी

मालाड भिंत दुर्घटनेत ३० वा बळी

Subscribe

दोन आठवड्यांपूर्वी मुंबईच्या मालाड परिसरामध्ये जलाशयाची संरक्षक भिंत पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आता ३० झाला आहे.

मालाडच्या आंबेडकरनगर आणि पिंपरीपाडा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी ३० व्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नाय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अभिजीत गाडे यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ३० वर पोहोचला आहे. मालाड दूर्घटनेतील अभिजीत गाडे यांचा मृत्यू झाल्याची माहिती नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. त्यांच्या शरीराला गुंतागुतीच्या दुखापती झाल्या होत्या. वाहून आलेल्या पाणी आणि मातीमुळे अॅब्डॉमिनल इंज्युरी अधिक असल्याचं डॉ. भारमल यांनी सांगितलं.

मालाडनंतर काही दिवसांतच डोंगरी!

दरम्यान, गेल्या मंगळवारी राजू बने या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर, पाण्यात वाहून गेलेल्या सोनाली सपकाळचा मृतदेह वर्सोवा येथे आढळून आला. अद्यापही जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अभिजीत यांच्यावर अधिक उपचारांसाठी नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, अखेर मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. एकीकडे मालाड दुर्घटनेतील जखमींवर अजून उपचार सुरू असतानाच आता डोंगरी इमारत दुर्घटनेतल्या जखमीवर उपचार करण्याची वेळ मुंबईतल्या रुग्णालयांवर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मालाड जलाशयालाही भेगा पडल्याची भीती व्यक्त

काय घडलं मालाडमध्ये?

३ जुलै रोजी मालाड पूर्वमधल्या पिंपरीपाडा परिसरामध्ये असलेल्या जलाशयाची संरक्षक भिंत मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळली होती. मध्यरात्री ही भिंत कोसळल्यामुळे तिच्या आडोशाला उभारण्यात आलेल्या झोपडपट्ट्यांचं यात मोठं नुकसान झालं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ३० जणांना प्राण गमवावे लागले असून १००हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -