घरमहाराष्ट्रमोरापाडा अंगणवाडीस बीडीओची भेट

मोरापाडा अंगणवाडीस बीडीओची भेट

Subscribe

महानगर इम्पॅक्ट

मुरुड तालुक्यतील बोर्ली-मोरापाडा अंगणवाडीमध्ये अनेक गैरसोयींमुळे कर्मचार्‍यांसह छोट्या विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागतो. त्यासंबधीचे वृत्त ‘आपलं महानगर’मध्ये सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर गट विकास अधिकारी (बीडीओ) राजनंदिनी भागवत यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी संजय शेडगे यांनी तातडीने भेट देऊन सर्व परिस्थितीची माहिती घेतली.

भागवत यांनी अंगणवाडी सेविकेकडून माहिती घेतली. तत्पूर्वी, त्यांनी ग्रामविस्तार अधिकारी पांडुरंग गाडेकर यांच्याशी चर्चा केली. अंगणवाडीमध्ये पाणी व विद्युत पुरवठा करण्यासाठी सोलर पॅनल त्वरित सुरू करण्याचे आदेश गाडेकर यांना देण्यात आल्याचे भागवत यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -