घरमुंबईफार्मसीच्या दुसर्‍या फेरीत 14 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

फार्मसीच्या दुसर्‍या फेरीत 14 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

Subscribe

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी) राबवण्यात येणार्‍या फार्मसीची दुसरी प्रवेश यादी सोमवारी रात्री जाहीर झाली. दुसर्‍या कॅप राऊंडमध्ये राज्यातील तब्बल 14 हजार विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. दुसर्‍या कॅप राऊंडसाठी राज्यातून 53 हजार 442 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले होते.

फार्मसी अभ्यासक्रमासाठी राज्यात 19 हजार 725 जागा असून, या जागांसाठी राज्यातून तब्बल 56 हजार 556 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामुळे फार्मसीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या कॅप राऊंडमध्ये 17 हजार 174 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील 9 हजार 420 विद्यार्थ्यांनी एआरसी सेंटरवर जाऊन प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे दुसर्‍या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांना 10 हजार 305 जागा उपलब्ध झाल्या.

- Advertisement -

उपलब्ध जागेसाठी 38 हजार 676 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज निश्चित केले. यातून सोमवारी जाहीर झालेल्या दुसर्‍या कॅप राऊंडच्या यादीत 14 हजार 873 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना 23 जुलैपर्यंत प्रवेश केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश केद्रावर प्रवेश निश्चित झाल्यानंतर 24 जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेज किंवा संस्थेमध्ये जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.

फार्मसीचे कॉलेज 1 ऑगस्टपासून सुरू
दोन कॅप राऊंडनंतर शिल्लक राहणार्‍या जागांची यादी 25 जुलैला तिसर्‍या कॅप राऊंडमध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तिसर्‍या कॅप राऊंडची प्रक्रिया 2 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र फार्मसीचे कॉलेज 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -