घरमहा @२८८दौंड विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९९

दौंड विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९९

Subscribe

पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड हा (विधानसभा क्र. १९९) विधानसभा मतदारसंघ आहे.

१९९ क्रमांकाचा दौंड मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील बारामती या लोकसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३४० मतदान केंद्र आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघ हा कायमच नवीन निकाल देणारा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाला २००९ च्या निवडणुकीपासून चमत्कारी मतदार संघ म्हणून ओळख निर्माण झाली.

शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा दौंड मतदारसंघ. या मतदारसंघातील जनतेने गेली दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावललं आहे. २००९ च्या निवडणुकीत राहूल कूल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उमेदवारी दिली होती. यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून रमेश थोरात हे देखील निवडणुकीच्य़ा रिंगणात उभे होते. थोरात यांनी २००९च्या निवडणुकीत राहूल कूल यांचा पराभव केला होता. रमेश थोरात विजयी झाल्याने शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समाविष्ट करून घेतले. मात्र २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रमेश थोरात यांना उमेदवारी दिली. यामुळे राहूल कूल यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश केला. या पक्षातून उमेदवारी मिळवत राहूल कूल यांनी रमेश थोरात यांचा पराभव केला.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १९९

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – १,४३,६२४

महिला – १,२८,३७५

एकूण मतदार – २,७१,९९९


विद्यमान आमदार – अॅड. राहूल सुभाष कुल

अॅड. राहूल सुभाष कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ८७,६४९ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे रमेश थोरात उभे होते. यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षच्या अॅड. राहूल सुभाष कुल यांनी ८७,६४९ एवढी मते घेत विजय मिळवला. दौंड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात होते. त्यांना ७६,३०४ मते मिळाली आणि त्यांचा ११,३४५ मतांनी पराभव झाला. दौंड विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर मनसेचे राजाभाऊ तांबे, चौथ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाचे विकास ताकवणे आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेनेचे राजेंद्र खट्टी हे होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • अॅड. राहूल सुभाष कुल, राष्ट्रीय समाज पक्ष – ८७,६४९
  • रमेश थोरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ७६,३०४
  • राजाभाऊ तांबे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १७,०९८
  • विकास ताकवणे, शेतकरी कामगार पक्ष – ५,५६०
  • राजेंद्र खट्टी, शिवसेना – २,९७४

नोटा – १४६०

मतदानाची टक्केवारी – ७३.३३%


हेही वाचा – बारामती लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -