घरमहा @२८८चिमूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७४

चिमूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७४

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ७४) आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात येतो. २०११च्या जनगननेनुसार चिमूरची लोकसंख्या ही १ लाख ६९ हजार ५४७ इतकी आहे. या मतदारसंघावर सर्वाधिक प्रमाणात काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. २०१४ साली पहिल्यांदा भाजपला या मतदारसंघातून सत्ता मिळाली. याअगोदर विजय वडेट्टीवर शिवसेनेत असताना २००४ साली युतीला या मतदारसंघात सत्ता मिळाली होती. १९९५ साली डॉ. रमेशकुमार गजबे हे अपक्ष उमेदवार चिमूरमधून निवडून आले होते. १९०५, २००४ आणि २०१४ वगळता सर्व निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसच्या हाती सत्ता आलेली आहे.

मतदारसंघ क्रमांक – ७४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३४,८१४
महिला – १,२७,३२८
एकूण मतदार – २,६२,१४२

- Advertisement -

विद्यमान आमदार – किर्तीकुमार ऊर्फ बंटी मितेश भांगडिया, भाजप

Mla Bunty Bhangdiya
विद्यमान आमदार बंटी भांगडिया

बंटी भांगडिया चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी चिमूरमध्ये तरुणांना संघटीत केले आणि अनेक समाजपयोगी कामे केली आहेत. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) किर्ताकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, भाजप – ८७,३७७
२) डॉ. अविनाश वारजूकर, काँग्रेस – ६२,२२२
३) गजानन बुटके, शिवसेना – १२,१०५
४) नरेंद्रकुमार डडमल, बसप – ९,८४१
५) अरविंद संडेकर, मनसे – ७,१७७


हेही वाचा – १२ – गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -