घरमुंबईरुग्णवाहिका ठरतेय चाकावरचे 'प्रसुतीगृह'

रुग्णवाहिका ठरतेय चाकावरचे ‘प्रसुतीगृह’

Subscribe

१०८ रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात जवळपास ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवदान मिळाले आहे. पण, हीच रुग्णवाहिका आता महिलेच्या बाळंतपणासाठी ही उपयोगी ठरत आहे. या रुग्णवाहिकेत आतापर्यंत ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे झाली आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या १०८ रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात जवळपास ४२ लाख ४५ हजार रुग्णांना जीवदान मिळाले आहे. पण, हीच रुग्णवाहिका आता महिलेच्या बाळंतपणासाठी ही उपयोगी ठरत आहे. १०८ क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत आतापर्यंत ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे झाली आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळपास हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

आपत्कालीन सेवेमुळे ४२ लाख रुग्णांना जीवनदान

रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी १०८ हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.

- Advertisement -

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत प्रसूती


वर्ष                          प्रसूतीची संख्या

२०१४                            २१००
२०१५                            ४,२१३
२०१६                             ६०००
२०१७                             ६,५८०
२०१८                             ११,१४१
२०१९ (३१ जुलैपर्यंत)            ,९००

अशा सुमारे ३३ हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

२०१४ ते जुलै २०१९ पर्यंत जवळपास ३ लाख ४६ हजार रस्ते अपघातातील जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील सुमारे ४२ लाख ४५ हजार रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. एकनाथ शिंदे; आरोग्यमंत्री

राज्यात ९३७ रुग्णवाहिकेद्वारे अपघात आणि इतर रुग्णांना सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. २ वर्षांपूर्वी मुंबईत बाईक रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांचे प्राण वाचवणं शक्य झालं आहे. या सेवेचा विस्तार मुंबईमध्ये १८, पालघरअमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक रुग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत.  – डॉ. प्रदीप व्यास; राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव


हेही वाचा – ‘१०८’ रुग्णवाहिका १६ हजार रुग्णांसाठी देवदूत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -