घरमुंबई'महक'च्या रहिवाशांचा उल्हासनगर महापालिकेवर मुकमोर्चा

‘महक’च्या रहिवाशांचा उल्हासनगर महापालिकेवर मुकमोर्चा

Subscribe

ऐन पावसाळ्यात येथील ३१ कुटुंबियांना बेघर व्हावे लागले. त्यामुळे बेघर झालेल्या 'महक'मधील कुटुंबियांनी आज पालिकेवर मुकमोर्चा काढला

मागील आठवड्यात येथील ‘महक’ ही ५ मजली इमारत कलल्याने या इमारतीतील ३१ कुटुंबियांना पालेकेने घरे खाली करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही इमारत कोसळली. मात्र ऐन पावसाळ्यात येथील ३१ कुटुंबियांना बेघर व्हावे लागले. त्यामुळे बेघर झालेल्या ‘महक’मधील कुटुंबियांनी आज पालिकेवर मुकमोर्चा काढला. दरम्यान आज पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत साई पक्षाच्या १२ नगरसेवकांनी ‘महक’च्या रहिवाशांसाठी तीन महिन्यांचे मानधन जाहीर केले आहे. यावेळी महापौरांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील ‘महक’च्या रहिवाशांसह राज्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर केली.

म्हणून ‘महक’नंतर इतर इमारतीसुद्धा खाली करण्यात आल्या

फर्नीचर बाजाराच्या लिंकरोडवर असलेल्या ‘महक-ए’ ही इमारत कलल्याने या इमारतीतील खोल्यांचे दरवाजे जाम झाले होते. पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशान्वये सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी या इमारतीतील ३१ कुटुंबातील १५० सदस्यांना बाहेर काढून इमारत खाली केली होती. यावेळी ‘महक’ची ‘बी’ विंग देखील खाली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महक इमारत कोसळली. त्यानंतर ‘महक’च्या बाजूला असणाऱ्या ‘रतन’, ‘धरम’ व ‘मंगलम’ या तिन्ही इमारतीसुद्धा खाली करण्यात आल्या. आयुक्त सुधाकर देशमुख यांनी इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट केल्याशिवाय स्थानिकांनी राहू नये, असा पवित्रा घेतल्याने आजुबाजूच्या पाच इमारती मधील शेकडो कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

१४ ऑगस्ट रोजी रहिवाशांची बैठक पार पडली

१४ ऑगस्टच्या सायंकाळी ‘महक’ व अन्य इमारतीच्या परिसरातील राहिवाशांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर संजय लुल्ला, विकी इसराणी, मयुर खत्री, चिंटू खत्री, नितेश ठाकूर, मांजेश गोरेजा, संजय आहुजा, पवन पंजवानी, अमित वाधवा, रोहित सैनानी, संजय तलरेजा या तरुणांनी १५ ऑगस्टच्या पहाटे लोकल पकडून मंत्रालय गाठले. ध्वज वंदनासाठी जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी कायदा करण्याची मागणी करण्यासाठी हे तरुण गेले होते. मात्र मंत्रालयाच्या मुख्यद्वारावर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांना मरीन ड्राइव्ह येथील पोलीस ठाण्यात दुपारी १ वाजे पर्यंत बंद करून ठेवण्यात आले होते.

हेही वाचा – पालिकेच्या दुर्लक्षामुळे साडे चार एकराचे खेळाचे मैदान मुंबईकर गमावणार

मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्डद्वारे घर देण्याची मागणी

त्यानंतर त्याच दिवशी बेघर झालेल्या या इमारतीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्टकार्ड पाठवून ‘बेघरांना घर देता का घर.?’ची मागणी केली आहे. दरम्यान आज उल्हासनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा असल्याने ‘महक’च्या रहिवाशांनी महिला-बच्चे कंपनीला सोबत घेऊन हाताला काळ्या फीत, तोंडावर मास्क व हातात बैनर घेऊन मुकमोर्चा काढत ‘बेघरांना घर देता का घर?’ म्हणून मागणी केली.

- Advertisement -

बेघरांना नगरसेवकांचे तीन महिन्यांचे मानधन

उल्हासनगरमधील या तीन इमारतींमधून बेघर झालेल्या रहिवाशांनी घराच्या मागणीसाठी आज पालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाचे पडसाद आजच्या पालिकेच्या महासभेमध्ये उमटले. महापौरांसह साई पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीन महिन्यांचे मानधन या बेघर रहिवाशांना देण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी पूरग्रस्तांना देखील मदत जाहीर केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -