घरमुंबईआजपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टची पहिली इलेक्ट्रिक बस धावणार

आजपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टची पहिली इलेक्ट्रिक बस धावणार

Subscribe

आजपासून मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टची पहिली इलेक्ट्रिक बस धावणार आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टची पहिली इलेक्ट्रिक बस आज म्हणजे सोमवारी धावणार आहे. बस मार्ग क्रमांक ३०२ या मार्गाने या बस धावणार आहेत. सायन ते कुर्ला अशी ही बस चालवण्यात येणार आहे. कमानी, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप असा प्रवास करत हा बस मार्ग मुलुंडला संपेल. या मार्गावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे बसची मोठी मागणी होती. सध्या बेस्टच्या ताफ्यात सहा वातानुकूलित आणि चार विनावातानुकूलित इलेक्ट्रिकल बसगाड्या दाखल झाल्या आहेत. या बसगाड्यांचे चार्जिग स्टेशन धारावी बस आगारात असणार आहे. एकदा चार्ज केल्यावर दिवसभर या गाड्या चालणार आहेत. गुरुवारी एसटीच्या पहिल्या इलेक्ट्रिकल बसचे लोकार्पण करण्यात आले. या बसचे नामकरण शिवाई असे ठेवण्यात आले होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्या बसचे लोकार्पण करण्यात आले होते. अगदी तशीच बस आता मुंबईत धावणार आहे.

बसची माहिती मोबाईल अॅपवर मिळणार

इलेक्ट्रिकल बसची माहिती आता अॅपवर मिळणार आहे. ही बस कुठे आहे? आणि तिची जाण्यायेण्याची संपूर्ण माहिती मुंबईकरांना मिळणार आहे. यासंदर्भात एकही अॅपही आजपासून सुरु करण्यात आले आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -