घरमुंबई'जुळ्या मुलांचा बळी दे, तुझ्या अडचणी दूर होतील'; अंधश्रद्धेतून शनायाचा खून

‘जुळ्या मुलांचा बळी दे, तुझ्या अडचणी दूर होतील’; अंधश्रद्धेतून शनायाचा खून

Subscribe

कुलाबा हत्येचे गूढ उलगडले

अंधश्रद्धेपायी मनुष्य कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना मुंबईतील कुलाब्यात उघडकीस आली आहे. कुलाबा येथे शनाया प्रेम हातरिमाणी या तीन वर्षांच्या मुलीची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. अखेर शनायाच्या हत्येचे गूढ उलगडले आहे. तिच्या हत्येमागे ब्लॅक मॅजिक असल्याचे उघड झाले आहे. सोमवारी आरोपीच्या राहत्या घरातून पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे. त्यात ‘जगायचे आहे, प्रगती करायची असेल तर जुळ्या मुलांचा बळी दे’ अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला होता. याप्रकरणी अनिल विशु चुगानीविरुद्ध हत्येसह जादूटोणा कलमांतर्गत आता कारवाई करण्यात आल्याचे एसीपी सुभाष खानविलकर यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून काल, ९ सप्टेंबर रोजी आरोपीला अटक केली आहे.

- Advertisement -

अनिल हा तक्रारदार प्रेमलाल हातरिमाणीचा बालपणीचा मित्र असून प्रेमला दोन जुळ्या मुली असल्याची माहिती अनिलला असल्याने तो सहा महिन्यांपूर्वी मोरोक्को येथून कुलाबा येथील राहत्या घरी आला होता. प्रेमलालच्या इमारतीच्या बाजूच्याच इमारतीमध्ये तो राहत होता. सहा महिन्यांत त्याने मित्राच्या दोन्ही मुलींशी जवळीक निर्माण केली. शनायाची हत्या केल्यानंतर त्याला तिची बहीण श्रेयाची हत्या करायची होती. मात्र, मोलकरणीमुळे त्याचा हा प्रयत्न फसला गेला. अनिलचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, पत्नीशी पटत नसल्याने ती माहेरी निघून गेली.

गेल्या पंधरा वर्षांपासून तो मोरोक्को देशात वास्तव्यास होता. तिथेच त्याचे आई-वडील स्थायिक झाले आहेत. मोरोक्कोमध्ये अनिल हा शॉपमध्ये कामाला होता. यावेळी त्याची ओळख एका महिलेशी झाली होती. या महिलेने त्याला जगायचे आहे, प्रगती करायची असेल तर जुळ्या मुलांचा बळी द्यावा लागेल, असे सांगितले होते. तिचे तेच वाक्य त्याच्या मनात होते. प्रेमला दोन जुळ्या मुली आहेत याची त्याला माहिती होती. त्यामुळे या दोन्ही मुलींचा बळी देण्याचा त्याने कट रचला होता.

- Advertisement -

मोलकरणीमुळे डाव फसला

घरात मन रमत नसल्याने तो अनेकदा प्रेमच्या घरी जात होता. तिच्या दोन्ही मुलींशी खेळत होता. त्यांच्याशी जवळीक निर्माण करून तो त्यांना त्याच्या घरी नेण्याचा आग्रह धरत होता. अखेर प्रेमने त्याला शनिवारी दोन्ही जुळ्या मुलीसह जय या मुलाला त्याच्या घरी पाठविले होते. ते तिघेही पहिल्यांदाच अनिलच्या घरी जात असल्याने प्रेमने मुलांसोबत त्यांची मोलकरीण काकुली मंडल हिला पाठविले होते. घरी आल्यानंतर अनिलने तिन्ही मुलांना चॉकलेट दिले. चॉकलेट खाल्ल्यानंतर शनायाचे हात खराब झाले होते, हात धुण्याच्या बहाण्याने त्याने तिला बेडमरुममध्ये नेले आणि नंतर सातव्या मजल्यावरून तिला खाली फेकून दिले. शनायाला फेकून दिल्यानंतर त्याला श्रेयालाही तशाच प्रकारे सातव्या मजल्यावरून फेकून द्यायचे होतेर. मात्र, मोलकरीणीमुळे त्याचा हा प्रयत्न फसला गेला. बराच वेळ झाल्यानंतर शनाया रुममधून बाहेर आली नाही. त्यामुळे काकुलीने त्याला विचारणा सुरू केली होती. मात्र, अनिलने बेडरुमचा दरवाजा बंद करून स्वतला कोंडून घेतले होते. याच दरम्यान शनाया ही एका कारवर पडून गंभीररीत्या जखमी झाल्याचे काही रहिवाशांच्या निदर्शनास आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा अपघात नव्हे तर हत्या असल्याचे उघडकीस आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -