घरमहाराष्ट्रपुण्यात राष्ट्रवादी ४ तर काँग्रेस ३ जागांवर लढणार; अजित पवार यांची घोषणा

पुण्यात राष्ट्रवादी ४ तर काँग्रेस ३ जागांवर लढणार; अजित पवार यांची घोषणा

Subscribe

पुण्यात रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली. पुण्यातील पर्वणी, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या चार मतदारसंघांमधून राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. पर्वनी मतदारसंघासाठी काँग्रेस पक्ष आग्रही होता. मात्र, अजित पवार यांच्या घोषणेनुसार काँग्रेसची ही मागणी मान्य न झाल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. याशिवाय ‘ज्या जागा मित्र पक्षांकडे आहेत, त्या जागांवरही मेहनत करा’, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा – कलम ३७० हटवण्याला विरोध करणं काँग्रेस-राष्ट्रवादीचा निर्लज्जपणा – अमित शहा

- Advertisement -

काँग्रेससाठी ३ तर मित्र पक्षासाठी १ जागा

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती जाहीर केली. अजित पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पर्वणी, हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या चार मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट या मतदारसंघातून लढणार आहेत. याशिवाय मित्र पक्षासाठी कोथरुडची जागा सोडण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -