घरमहाराष्ट्रवासिंदमध्ये कचर्‍याच्या ढिगांना आग

वासिंदमध्ये कचर्‍याच्या ढिगांना आग

Subscribe

प्रदुषणामुळे नागरिकांना त्रास

तालुक्यातील वासिंद शहापूर रस्त्यालगत पेट्रोल पंपाजवळ टाकलेल्या पेटत्या कचर्‍यामुळे लगतच्या पेट्रोल पंपासह ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. काही कचरा घरोघरी जाऊन तर काही साठलेला कुंड्यामधील उचलला जातो. मात्र शहरातील या मुख्य रस्त्यालगतच्या भागात हा साठलेला कचरा त्याच जागी पेटवून दिल्याचे प्रकार दिसून येत आहे. या पेटत्या कचर्‍यामुळे सर्वत्र धुराचे सावट पसरून यामुळे धोकादायक वातावरण निर्माण झाले आहे. तर यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

सध्या ग्रामपंचायत विभागाकडे हक्काची डपिंग ग्राऊंड व्यवस्था नसल्याने कचरा समस्या निर्माण झाली आहे. या जागोजागी पडलेल्या घाणीमुळे व पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या ठिकाणाचा कचरा अनेक दिवसांपासून पडून राहत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
– प्रितम दामोदरे, स्थानिक रहिवासी

- Advertisement -

सध्या ज्या ठिकाणी बाहेर कचरा टाकण्याची व्यवस्था आहे. त्याठिकाणी समस्या निर्माण झाली असून या ठिकाणी मोठी वाहने जात नाही. त्यामुळे काही दिवस रहिलेला कचरा पेटविला जातो. दोन तीन दिवसांनी संपूर्ण कचरा उचलला जाईल.
– लता शिंगवे, सरपंच ग्रा.पं.वासिंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -