घरमहाराष्ट्र'तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर...'; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर...

‘तेव्हा ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर…’; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

Subscribe

शुक्रवारी राष्ट्रवादीची सातारा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस पडला. मात्र, भर पावसांत शरद पवार यांनी भाषण केले. यानंतर पवार यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. मात्र, त्यांच्या भर पावासातील सभेवरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

‘तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज तुमच्यावर पावसांत सभा घेण्याची वेळच आली नसती’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शुक्रवारी राष्ट्रवादीची सातारा येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शरद पवार यांची सभा सुरु असताना मुसळधार पाऊस पडला. मात्र, भर पावसांत शरद पवार यांनी भाषण केले. यानंतर पवार यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. मात्र, त्यांच्या भर पावासातील सभेवरुन उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. माण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शेखर गोरे यांच्या प्रचाराप्रत्यर्थ ठाकरे यांची आज प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शेखर गोरे यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे जयकुमार गोरे हे शेखर गोरे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यामुळे माण मतदारसंघात दोन सख्या भावांमध्ये लढत बघायला मिळत आहे.

हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’च्या शिफारसीवरुन शिवसेनेची भाजपवर टीका

- Advertisement -

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘माणमध्ये शिवसेना आणि भाजप समोरासमोर निवडणूक लढत असले तरी यातून निवडून येणारा शिवसेनेचा उमेदवार शेखर गोरे हा सरकारचाच घटक असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. शिवसेना आणि भाजपने युती करुन भगवा विचारांचे एक मजबूत सरकार बनवले आणि राज्याला आपले स्थिर सरकार दिले. स्थिर सरकार दिल्यानंतर आता सगळे बोंबाबोंब करत आहेत, सगळीकडे पावसात सभा घेताहेत. अरे तेव्हा जर तुम्ही ७० हजार कोटींचा घोटाळा केला नसता तर आज तुमच्यावर पावसांत सभा घेण्याची वेळच आली नसती. लोकांनी तुम्हाला सांगितले असते की तुम्ही आमच्या इकडे सभा घेण्याची गरजच नाही. तुम्ही प्रचारही करु नका. आम्ही तुम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण जेव्हा करायचे होते तेव्हा केले नाही आणि जेव्हा आपले सरकार मजबूत होऊन पुढे पाऊल टाकत आहे तेव्हा अपशकून करायचे. समाजासामाजामध्ये भिंती उभ्या करायच्या, मराठा समाज एकीकडे, धनगर समाज एकीकडे, माळी समाज एकीकडे, कशाला करतात? या समाजात तुम्ही आम्ही नव्हतो? सगळा समाज एक आहे, माताभगीनी, बांधव आहेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महारांचे उदाहरण दिले. शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र आणून स्वराज्य निर्माण केले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -