घरक्रीडाशिवा थापासह तिघे अंतिम फेरीत

शिवा थापासह तिघे अंतिम फेरीत

Subscribe

ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धा

भारताच्या शिवा थापाने ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेतील ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच पूजा राणी (७५ किलो) आणि आशिष (६९ किलो) यांनाही या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. मात्र, भारताच्या चार बॉक्सर्सना या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

चार वेळच्या आशियाई पदकविजेत्या शिवा थापाने ६३ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत जपानच्या दायसुके नारीमात्सुवर मात केली. एशियाड स्पर्धेतील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने ब्राझीलच्या बेट्रीझ स्वारेसचा पराभव केला. राणीने यावर्षी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रात झालेल्या पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात आशिषने जपानच्या हिरोआकी किंज्योला पराभूत करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

- Advertisement -

महिलांदामध्ये माजी ज्युनियर विश्व विजेत्या निखत झरीन (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), तर पुरुषांमध्ये सुमित सांगवान (९१ किलो) आणि वाहलीमपुईआ (७५ किलो) यांचा मात्र उपांत्य फेरीत पराभव झाला. झरीनला जपानच्या सना कवानोने आणि वाहलीमपुईआला युईतो मोरीवाकीने पराभूत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -