घरमुंबई'मजा आता है'; संजय राऊतांचा भाजपला टोला

‘मजा आता है’; संजय राऊतांचा भाजपला टोला

Subscribe

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

विधानसभा निवडणुका पार पडून निकाल सुद्धा लागले. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. पण अद्याप महायुतीचा सत्तास्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत हे ट्विट आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सत्तास्थापनेबाबत आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

- Advertisement -

काय म्हटले आहे संजय राऊत यांनी?

आपल्या ट्विटर अकाऊंटवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत हातात हात घेऊन चालत आहेत. तसेच या फोटोवर एक सूचक वाक्य आहे. ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है!’ असे लिहिले आहे. या फोटोला संजय राऊत यांनी ‘जय हिंद’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान राज्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आपापल्या मार्गाने वाट शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -