घरमुंबईपुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; भाजपकडून जाहीर!

पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; भाजपकडून जाहीर!

Subscribe

शिवसेना मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर ठाम असताना भाजपनं मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं एकतर्फी जाहीर करून टाकलं आहे. त्यामुळे आता शिवसेना यावर काय भूमिका घेणार? हा चर्चेचा विषय ठरला आहे.

एकीकडे शिवसेनेकडून संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून रोज पत्रकार परिषद घेऊन ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’, असं सांगत असताना आता भाजपनं देखील ‘पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील’, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे. मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला खुद्द मुख्यमंत्र्यांसोबत सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आदी भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, ‘शिवसेनेच्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहात आहोत. पण लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होईल’, असं देखील या दोघांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

‘महायुतीचंच सरकार बनेल’

दरम्यान, यावेळी ‘पुढचं सरकार महायुतीचंच असेल’, असा ठाम दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ‘आजच्या बैठकीमध्ये राज्यातल्या पेचप्रसंगाचा आम्ही आढावा घेतला. शिवसेना-भाजप महायुतीला मतदारांनी जनादेश दिला आहे. या जनादेशाचा आदर ठेवत आम्ही महायुतीचं सरकार लवकरच स्थापन करू. आमच्या संसदीय बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांची नेतेपदी एकमताने निवड झाली आहे. त्यामुळे पुढचं सरकार त्यांच्याच नेतृत्वात बनेल’, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदावर तडजोड नाही!

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील या दोघांनी देखील ‘आम्ही शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत’, असं सांगत या पेचप्रसंगात भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. आत्तापर्यंत भाजपकडून पुढाकार घेतला जात नाही असं म्हटलं जात होतं. मात्र, आता भाजपनं एकतर्फीच मुख्यमंत्री भाजपचाच असेल असं जाहीर करताना शिवसेनेला पर्याय दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर भाजप तडजोड करणार नाही, असाच अप्रत्यक्ष इशारा भाजपनं शिवसेनेला दिला आहे.


हेही वाचा – ‘भाजपनं लिहून पाठवावं, मगच चर्चा’; संजय राऊतांची ठाम भूमिका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -