घरमुंबई'भाजपनं लिहून पाठवावं, मगच चर्चा'; शिवसेनेची ठाम भूमिका

‘भाजपनं लिहून पाठवावं, मगच चर्चा’; शिवसेनेची ठाम भूमिका

Subscribe

‘अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे नेते तयार असतील, तर ते समंजसपणाचं वक्तव्य आहे. गेल्या १२ दिवसांमधलं ते समंजसपणाचं वक्तव्य आहे. त्यांचे नेते म्हणतात शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. असं कसं तुम्ही म्हणता? प्रचारामध्ये अमित शहांसमोर जे ठरलं होतं, त्या ठरल्यानुसार करा हाच आमचा प्रस्ताव आहे. प्रश्न पाऊल पुढे घेण्याचा किंवा मागे घेण्याचा नाही आहे. सरकार स्थापनेमध्ये उशीर कुणामुळे होतोय? आमच्यामुळे होत नाहीये. जे ठरलंय, तोच प्रस्ताव आहे आणि तोच मान्य करावा, हा पहिल्यापासूनच आमचा प्रस्ताव आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालं होतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी भाजपच्या ‘देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील’, या भूमिकेवर दिली आहे.

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेला भाजप तयार!

दरम्यान, यावेळी पत्रकारांशी बोलताना ‘भाजप अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहे, आम्ही शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत’, अशी भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. पहिल्यांदाच भाजपकडून जाहीरपणे ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र, ‘भाजपची ही भूमिका समंजसपणाची असली, तरी त्यांनी हे लेखी स्वरूपात द्यावं, मगच चर्चा होईल’, असं शिवसेनेकडून संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

‘नवा प्रस्ताव का पाठवायचा?’


हेही वाचा – पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; भाजपकडून जाहीर!

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचं सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. तसंच, ‘शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नसून आम्ही त्यांच्या प्रस्तावाची वाट पाहात आहोत’, असं सांगतानाच आता भाजपकडून चर्चेसाठी पुढाकार घेतला जाणार नाही, असंच अप्रत्यक्षपणे भाजप नेत्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता ही चर्चा कोणत्या दिशेने जाणार, याची उत्सुकता राजकीय जाणकारांना आणि मतदारांना देखील लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -