घरलाईफस्टाईल'दुधा' ने खुलवा सौंदर्य

‘दुधा’ ने खुलवा सौंदर्य

Subscribe

सध्याच्या दगदगीमुळे आपण आपल्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करतो. त्यात वेळे अभावी आपल्याला पार्लरमध्ये जाणे देखील शक्य नसते. मात्र असे असताना देखील दूधाचे फेस पॅक तयार करुन तुम्ही तुमचा चेहरा घरच्या घरी खुलवू शकता.

दूधामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन्सचा समावेश असतो. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण दूधाचे सेवन करतात. मात्र हे दूध पिण्यापूर्तेच मर्यादीत राहिलेले असून याचा आपण घरच्या घरी सौंदर्य खुलवण्यासाठी देखील वापर करु शकतो.

  • डोळ्याखालील काळी वर्तुळे सौंदर्याला बादा आणतात. ही काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना दूधामध्ये गुलाब जल मिसळून ते दूध काळ्या वर्तुळांवर लावावे. यामुळे काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

milk face pack

- Advertisement -
  • कापूस दूधामध्ये भिजवून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा कोमल आणि मुलायम होण्यास मदत होते.
  • बेसनच्या पिठात थोडेसे दूध मिसळून तयार केलेली पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याला एक वेगळा ग्लो येतो.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी बदामाचा फेस पॅक हा सर्वात उत्तम पर्याय आहे. बदामाच्या पावडरमध्ये दूध मिसळून तयार झालेला फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.

milk face pack

  • चेहरा काळवंडला असल्यास तांदळाच्या पीठात दूध आणि मध मिसळून तयार झालेला फेस पॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे चेहऱ्याचा काळपटपणा दूर होऊन उजळण्यास मदत होते.

 

  • चेहरा उजळण्यासाठी हळद आणि दूध एकत्र करुन त्याची पेस्ट तयार करुन चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -