घरमुंबईसंजय राऊत रुग्णालयातही काम करत आहेत; फोटो व्हायरल

संजय राऊत रुग्णालयातही काम करत आहेत; फोटो व्हायरल

Subscribe

शिवसेना नेते संजय राऊत यांचा रुग्णालयातील एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ते रुग्णालयात काम करत असल्याचे दिसत आहेत. हा फोटो एन्जिओप्लास्टी होण्याअगोदरचा आहे, अशी माहिती मिळत आहे. ते ‘सामना’ अग्रलेख लिहित होते. सोमवारी दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे ते रुग्णालयात गेले. तिथे त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यात त्यांच्या ह्रदयात २ ब्लॉक असल्याचं निष्पन्न झाले. त्यावर लगेच शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर आज सकाळी राऊत यांचा रुग्णालयात काम करत असल्याचा फोटो व्हायरल होत आहे.

आशिष शेलार यांनी घेतली राऊत यांची भेट

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतली आहे. रुग्णालयात पोहोचल्यावर शेलार यांनी राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

- Advertisement -

शरद पवार यांनीही घेतली संजय राऊत यांची भेट

संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अँजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील संजय राऊत यांची लिलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपासून केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -