घरटेक-वेकSamsung चा 'हा' फोल्डेबल स्मार्टफोन झाला लाँच

Samsung चा ‘हा’ फोल्डेबल स्मार्टफोन झाला लाँच

Subscribe

कनेक्टविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, ग्लोनास, USB ३.१, NFC, वाय-फाय आणि VoLTE सारखे फीचर्स

Samsung W20 5G फोल्डेबल स्मार्टफोनला चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कंपनीने या फोनची किंमत जाहीर केली नसून डिसेंबरमध्ये ग्राहकांना कळवण्यात येणार आहे. या फोनची रचना Samsung Galaxy Fold सारखी असून या फोनला काही दिवसांपूर्वी जागतिक स्तरावर लाँच केले होते. या स्मार्ट फोनचे फीचर्स साधारण Samsung Galaxy Fold सारखेच आहेत.

- Advertisement -

असे आहेत W20 5G चे फीचर्स

  • स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर
  • Samsung W20 5G हा स्मार्टफोन पांढऱ्या रंगातही उपलब्ध
  • स्मार्टफोनच्या चार्जिंगसाठी ४२३५ एमएएचची बॅटरी
  • 5G सपोर्टसह हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच
  • फोनचा मेन डिस्प्ले ७.३ इंच QXGA+ डायनेमिक एमोलेड
  • सेकेंडरी ४.६ इंचचा HD+ सुपर एमोलोड डिस्प्ले
  • ७२० x १६८० पिक्सल रेजोल्यूशन
  • १.८ गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ८५५ प्लस प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम
  • कनेक्टविटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ, ग्लोनास, USB ३.१, NFC, वाय-फाय आणि VoLTE सारखे फीचर्स

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनला ६ कॅमेरा देण्यात आले आहे. १२ मेगापिक्सल ड्यूल पिक्सल सेंन्सर असून LED फ्लॅशसह सादर करण्यात आला आहे. याला १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आहे. तर तिसरा १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर आहे. हा फोन जेव्हा अनफोल्ड होतो तेव्हा याचा फ्रन्ट कॅमेरा १० मेगापिक्सलचा होईल आणि सेंकडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असणार आहे.


ट्रिपल कॅमऱ्यासह Infinix S5 Lite भारतात लाँच; जाणून घ्या फीचर्स
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -