घरमहाराष्ट्रआरे कारशेडच्या कामाला स्थगिती; ठाकरे सरकारचा पहिल्या दिवशी निर्णय

आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; ठाकरे सरकारचा पहिल्या दिवशी निर्णय

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी धडाकेबाज कामाला सुरुवात केली. मुंबईकराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आरे मेट्रो कारशेडबाबत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, शुक्रवारी पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी धडाकेबाज कामाला सुरुवात केली. मुंबईकराच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आरे मेट्रो कारशेडबाबत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याचे त्यांनी आज, दुपारी मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकारांनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. तसेच आपण विकासाच्या किंवा मेट्रोच्या विरोधात नसून केवळ आरेतील झाडांच्या कत्तलीविरोधात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. आरेतील झाड तर सोडा एक पानही तोडता येणार नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री 

ठाकरे कुटुंबाने स्वतःसाठी काहीही केलं नाही हे सगळ्या पत्रकारांना माहित आहे. मी काहीही न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. महागाई, भ्रष्टाचार, टंचाई या सगळ्याचा सामना आम्हाला करायचा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

  • तीन पक्षाच सराकर हे आव्हान
  • विधानसभेच सभागृह मी अजून पाहिलेल नाही
  • मी मुख्यमंत्री म्हणून येईन अस सांगितंल नव्हतं
  • पत्रकारांकडून सकारात्मक टीका व्हावी
  • प्रथा, परंपरा माहिती नाही तरी शिवधनुष्य उचललं
  • महागाईचा सामना महाविकास आघाडीला करायचा आहे
  • मोठी आव्हान पाहून मी पळून गेलो नाही
  • हे सरकार जनतेशी नम्रपणाने वागल पाहिजे
  • मंत्रालय पत्रकार कक्षाने दक्ष असलं पाहिजे
  • सरकराने जनतेशी नम्रपणे वागायला हव
  • महाराष्ट्र आणि माझ वय सारखंच

हेही वाचा –

संजय राऊत म्हणतात, ‘आता गोव्यात भूकंप’; शिवसेनेचं मिशन गोवा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -