घरदेश-विदेशजिओचे ग्राहकांसाठी दोन नवीन प्लान

जिओचे ग्राहकांसाठी दोन नवीन प्लान

Subscribe

FTTX मंथली प्लान पीवी-३५१ आणि FTTX Weekly Plan- PV–१९९ हे ते दोन प्लान आहेत. दरम्यान दोन्हीही प्लानमध्ये जिओ टीव्ही व्हिडिओ कॉलिंगची अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.

टेलीकॉम सेक्टरमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स जिओने भारतीय बाजारात दोन नवे प्लान सादर केले आहेत. कंपनीचे दोन्ही प्लान जिओ फायबर सेवा यासाठी लॉन्च करण्यात आले आहेत. पण जिओचे हे प्लान आता जिओच्या वेबसाइटवर दिसत नाही आहेत. FTTX मंथली प्लान पीवी-३५१ आणि FTTX Weekly Plan- PV–१९९ हे ते दोन प्लान आहेत. दरम्यान दोन्हीही प्लानमध्ये जिओ टीव्ही व्हिडिओ कॉलिंगची अतिरिक्त सुविधा मिळणार आहे.

FTTX मंथली प्लान पीवी-३५१

रिलायन्स जिओच्या पहिल्या प्रीपेड रिचार्ज प्लानचं नाव FTTX मंथली प्लान पीवी-३५१ आहे. ३५१ रुपये एवढ्या किंमतीचा हा प्लान असणार आहे. जीएसटी आणि अन्य चार्ज जोडल्यानंतर या प्लानची किंमत ४१४.१८ रूपये होईल. रिलायन्स जिओ फायबरच्या या प्लानमध्ये ग्राहकांना लोकल, एसटीडी कॉलिंग, ५० जीबी डेटा १० एमबीपीएसनं ३० दिवसांसाठी मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर ग्राहकांना १ एमबीपीएसच्या स्पीडनं डेटा मिळेल. रिपोर्ट्सनुसार, ग्राहकांना या प्लाननुसार ३ महिने, ६ महिने आणि एक वर्षांसाठी (तुमच्या सोयीनुसार) प्रथम पैसे देणे आवश्यक असेल.

- Advertisement -

FTTX Weekly Plan- PV–१९९

यासोबतच कंपनी १९९ रूपयांचा प्लान देखील घेऊन आली आहे. FTTX Weekly Plan- PV–१९९ असं या प्लानचं नाव आहे. या प्लानची मूळ किंमत १९९ रुपये असून जीएसटीसोबत हा प्लान २३४.८२ रूपयांना उपलब्ध असणार आहे. या प्लानमध्येही यूजर्सना लोकल आणि एसटीडी फ्री कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळेल. या प्लानची वैधता केवळ ७ दिवसांसाठी असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -