घरक्रीडाझहीर पाशाला सुवर्णपदक

झहीर पाशाला सुवर्णपदक

Subscribe

आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धा

भारताच्या झहीर पाशाने महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि कॅरम असोसिएशन ऑफ पुणे आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक स्पर्धेतील ‘स्विस लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात सुवर्णपदक पटकावले. भारताच्याच अनिल मुंडे आणि के. श्रीनिवास यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.

पुण्याच्या पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेतील ‘स्विस लीग’च्या आठव्या फेरीमध्ये भारताच्या झहीर पाशाने अप्रतिम खेळ करत इर्शाद अहमदवर २५-१० असा विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या अनिल मुंडेने बांगलादेशच्या रहमान हाफिजूरचा २५-८ असा पराभव करत रौप्यपदकावर, तर के. श्रीनिवासने भारताच्याच संदीप दिवेचा २५-० असा धुव्वा उडवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

- Advertisement -

विजेत्यांना आंतरराष्ट्रीय कॅरम संघटनेचे अध्यक्ष जोसेफ मेयर, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शहा यांच्या हस्ते पदक आणि चषक देऊन गौरवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -