घरताज्या घडामोडीपंतप्रधान मोदींचा सन्मान राखा; प्रसाद लाड यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

पंतप्रधान मोदींचा सन्मान राखा; प्रसाद लाड यांचे उद्धव ठाकरेंना पत्र

Subscribe

राज्यात १२ दिवसांपूर्वी महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्य सरकारतर्फे वर्तमान पत्रात दिलेल्या जाहीरांतीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापलेला नाही. ही गोष्ट भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी निदर्शनास आणून दिली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून राज्य सरकारने पंतप्रधानपदाचा मान ठेवला पाहीजे, अशी मागणी केली आहे. तसेच माहिती व जनसंपर्क विभागाला याबाबत सूचना देण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या शासकीय जाहीरातींमध्ये पंतप्रधानांचा फोटो असावा, अशी मार्गदर्शक तत्वे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आहेत. तसेच काही जाहीरातींमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपालांचाही गरजेनुसार फोटो छापावेत, असे सांगण्यात आलेले असतानाही पंतप्रधान मोदींचा फोटो छापला जात नाही, ही खेदाची गोष्ट असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. पंतप्रधान पदाचा मान राखला गेला पाहीजे, अशी मागणी लाड यांनी केली आहे.

लहान भावाने मोठ्या भावाला विसरु नये

ही मागणी करताना प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठ्या भावाचा फोटो तरी लावा, अशी मागणी केली. “लहान भावाने मोठ्या भावाची आठवण ठेवावी, जुने भाऊ सोडले मात्र मोठ्या भावाचा तरी सन्मान करावा”, असा टोलाही प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

prasad lad letter
प्रसाद लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -