घरलाईफस्टाईलनिरोगी केसांसाठी नारळाच्या दूधाचा स्पा

निरोगी केसांसाठी नारळाच्या दूधाचा स्पा

Subscribe

केसांच्या आणि त्वचेच्या स्वास्थ्यासाठी हमखास उपयुक्त ठरणारा पर्याय म्हणजे नारळ. नारळाच्या दूधाचा स्पा घरच्या घरी तयार करुन केसांच्या, त्वचेच्या आरोग्यापासून सुटका होऊ शकते.

नारळ म्हणजे अर्थात श्रीफळ. हिंदू परंपरेत श्रीफळाला विशेष महत्त्व आहे. श्रीफळानेच कोणत्याही कार्याचा शुभारंभ केला जातो. त्याचप्रमाणे भारतीय खाद्यपदार्थांमध्येही नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याशिवाय सौंदर्य खुलवण्यासाठी सुद्धा नारळ उपयुक्त ठरतो. निरोगी, लांबसडक केसांसाठी आपली आई आपल्याला नेहमीच केसांना खोबरेल तेल लावण्यास सांगते. पण अनेकदा आपण दुर्लक्ष करतो. परिणामी आपल्याला केस रुक्ष होणे, कोंडा होणं यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी विविध उपाय करुन देखील या समस्या दूर होत नाहीत. परिणामी आपला वेळ आणि खर्च दोन्हीही वाया जातात. तेव्हा केसांच्या आणि त्वचेच्या स्वास्थ्यासाठी हमखास उपयुक्त ठरणारा पर्याय म्हणजे नारळ. नारळाच्या दूधाचा स्पा घरच्या घरी तयार करुन केसांच्या, त्वचेच्या आरोग्यापासून सुटका होऊ शकते.

नारळाच्या दूधाने केसांच्या मुळांना चांगला मसाज करावा. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत नारळाचं दूध चांगलं लावून घ्यावं. अर्धा तास केस तसेच ठेवा. त्यानंतर गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल घट्ट पिळून तो टॉवेल केसांना बांधा. यामुळे केसांना वाफ मिळेल. तीन ते चार वेळा थोडी थोडी वाफ घ्या. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. अधिक रुक्ष आणि डॅमेज केसांसाठी हा स्पा नक्कीच उपयुक्त ठरतो. या स्पा मुळे केस मऊ होतात.

- Advertisement -

केस धुतल्यानंतर मऊ केसांसाठी आपण कंडिशनर लावतो. यासाठी रसायनयुक्त कंडिशनर सहज वापरतो. पण यावर उपाय म्हणून आपण नारळाच्या दूधाचा कंडिशनर म्हणून वापर करु शकतो.

त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील नारळ उपयुक्त ठरतो. यासाठी नारळ पाण्यात चिमुटभर हळद, एक चमचा चंदन पावडर, काही थेंब टी ट्री ऑईस टाकून फेसपॅक करता येतो. उन्हाळ्यात हा फेसपॅक खूपच उपयुक्त ठरतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -