घरफिचर्सउजळ त्वचेसाठी 'हे' पदार्थ खा

उजळ त्वचेसाठी ‘हे’ पदार्थ खा

Subscribe

योग्य आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. या शिवाय सुंदर, निरोगी त्वचेसाठी खालील पाच पदार्थ नक्कीच खावेत.

तजेलदार, उजळ त्वचेसाठी महिलावर्ग विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधनं वापरतात. सौंदर्यप्रसाधनांमधील रसायनांमुळे अनेकदा त्वचेला गंभीर स्वरुपाची इजा देखील होते. त्यामुळे सुंदर उजळ त्वचेसाठी नैसर्गिक पदार्थ वापरणे केव्हाही चांगले. यासाठी सर्वप्रथम योग्य आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. या शिवाय सुंदर, निरोगी त्वचेसाठी खालील पाच पदार्थ नक्कीच खावेत.

- Advertisement -

संत्री – सध्या आपण कडाक्याची थंडी अनुभवत आहोत. या मोसमात संत्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. संत्र्यांमध्ये क जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी संत्री खाणे फायदेशीर ठरते.

- Advertisement -

आवळा – या दिवसात आवळा देखील सहज उपलब्ध होतो. आवळ्यामध्ये सुद्धा क जीनवसत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. तसेच त्वचेच्या अनेक आजारांवर आवळ्याचे सेवन उपयुक्त ठरते.

दही – रोजच्या आहारात दह्याचा नक्कीच समावेश करावा. त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे काम दही करतं.

मासे – तजेलदार त्वचेसाठी आहारात माशांचा समावेश करावा. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड विपुल प्रमाणात आढळतं. यामुळे त्वचेचा रुक्षपणा निघून त्वचा कोमल होते.

अक्रोड, अळशी – शाकाहारी जेवण करणारे माशांऐवजी अळशी बीया आणि अक्रोडचा समावेश करु शकतात. सुंदर, तजेलदार त्वचेसाठी अळशीच्या बीया आणि अक्रोड खाणं उपयुक्त ठरतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -