घरमहाराष्ट्रबेस्ट, टाटा वीज महागणार

बेस्ट, टाटा वीज महागणार

Subscribe

अदाणीच वीज स्वस्त होणार

बेस्ट आणि टाटा पॉवरने घरगुती वीज ग्राहकांच्या वीज दरात वाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० ते आर्थिक वर्ष २०२५-२६ यावर्षासाठी ही वीजदरवाढ असणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी टाटा पॉवरने ९ टक्के तर बेस्टने ७ टक्के वीजदर वाढीचा प्रस्ताव आयोगापुढे मांडला आहे. तर त अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडमार्फत मात्र घरगुती ग्राहकांसाठी वीजदर कपातीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

बेस्टची वीज ५ ते ७ टक्के महागणार
घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहक श्रेणीत बेस्टने ५ ते ७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे दाखल केला आहे. घरगुती ग्राहकांमध्ये १०० ते ३०० युनिट वापरकर्ता ग्राहकांसाठी बेस्टने ५ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगापुढे दाखल केला आहे. बेस्टचे मुंबई शहरात १०.१५ लाख वीज ग्राहक आहेत.

- Advertisement -

अदाणी वीज स्वस्त होणार

अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेडमार्फत (एईएमएलने) आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ दरम्यान वीजदरांसाठीची बहुवार्षिक याचिका राज्य वीज नियामक आयोगापुढे मांडली आहे. सुरूवातीच्या काही वर्षांसाठी वीजदरात कपात तर नंतर वीजदरात वाढीचा प्रस्ताव आयोगापुढे मांडण्यात आला आहे.

- Advertisement -

आर्थिक वर्ष २०२०-२१साठी एईएमएलने सुचवलेली एकंदर वीजदर कपात ६.८२ टक्के आहे. त्यापाठोपाठ २०२१-२२साठी ११.७० टक्के कपात सुचविण्यात आली आहे. २०२२-२३ व २०२४-२५ या वर्षात मात्र वीजदरात वाढ आहे.

टाटा पॉवरची वीजदरवाढ
टाटा पॉवरने छोट्या घरगुती वीज गहकांसाठी वीजदरात वाढीचा प्रस्ताव आयोगापुढे मांडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वीज कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण होणार आहे. टाटा पॉवरने २०१९-२० वर्षात बीपीएल ग्राहकांच्या वीजदरात ९९ टक्के तर १०१ ते ३०० युनिट वापरणार्‍या वीज ग्राहकांच्या दरात ९ टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. तर उर्वरीत वर्षात २०२४ सालापर्यंत मात्र टप्प्यात यामध्ये घट होणार असा प्रस्ताव मांडला आहे.

घरगुती ग्राहकांसाठी प्रस्तावित वीजदर

बेस्ट
युनिट वाढ (टक्के)
०-१०० ७ %
101-300 ५%

टाटा पॉवर

युनिट वाढ(टक्के)
०-१०० ९९ %
१०१-३०० ९

अदाणी मुंबई इलेक्ट्रिसिटी लिमिटेड
युनिट कपात (टक्के)
०-१०० ६.८२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -