घरताज्या घडामोडी'उदयनराजे यांना आता भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही'

‘उदयनराजे यांना आता भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही’

Subscribe

मंगळवारी भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकानिमित्ताने पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी या पुस्तकाबाबत संताप व्यक्त केला. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजेंवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, ‘उदयनराजे यांना आता भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. उदयनराजे हे भाजपा मध्ये काही मिळेल अशा आशेने गेले होते पण त्यांना काही मिळाले नाही. आता पुढे काही मिळेल म्हणून भाजपा समोर लोटांगण घालत आहेत.’

तसंच उदयनराजे यांनी पत्रकार परिषद जाणता राजा फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जाणता राजा ही उपमा दिली जाते. मी याचा निषेध करतो, असं म्हणतं त्यांनी पवारांवर टोला लगावला होता. यावर नवाब मलिक म्हणाले की, ‘जाणता राजा असं स्वतः शरद पवार कधीही स्वताला म्हणतं नाही किंवा आम्ही पक्षातर्फे देखील कधीही असं म्हणालो नाही. हे लोकांनी दिलेलं नावं आहे.’

- Advertisement -

यावेळी नवाब मलिक यांनी या वादग्रस्त पुस्तकाबाबत अशी अपेक्षा व्यक्त केली की, ज्यांनी पुस्तक लिहिलं त्या गोयल यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आम्ही पुस्तक मागे घेतो असं जाहीर केलं पाहिजं.


हेही वाचा – लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? – उदयनराजे भोसले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -