घरताज्या घडामोडीप्रिया वॉरियर अडकली हॅकर्सच्या जाळ्यात

प्रिया वॉरियर अडकली हॅकर्सच्या जाळ्यात

Subscribe

प्रिया आता या हॅकर्सच्या जाळ्यातून कशी सुटते हे लवकरच कळणार आहे.

नरजेने तरुणांना घायाळ करून सोडणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर रातोरात स्टार झाली असून तिला आता ‘नॅशनल क्रश’ म्हणून देखील ओळखलं जातं. आता ती आपल्या चाहत्यांना लवकरच सरप्राईज देणार आहे. सध्या प्रिया वॉरियर मुंबईत ‘लव हॅकर्स’ या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. शूटिंग दरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रिया ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. प्रियाने तिच्या करियरची सुरुवात ‘ओरू अदार लव’ या चित्रपटापासून केली होती. या चित्रपटातील एका व्हिडिओने इंटरनेटवर चांगला धुमाकूळ घातला होता.

- Advertisement -

‘लव हॅकर्स’ या चित्रपटामध्ये प्रिया वॉरियरसह सिद्धार्थ महाजन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मयंक प्रकाश श्रीवास्तव याने केलं आहे. क्राईम थ्रिलरवर आधारित ‘लव हॅकर्स’ हा चित्रपट असून सायबर क्राईमशी संबंधित लोकांच्या समस्यांविषयी यामध्ये दाखवण्यात आलं आहे. याशिवाय प्रिया हॅकर्सच्या जाळ्यात अडकते आणि ती यामधून कशी सुटते हे या चित्रपटात दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू झाले आहे.

View this post on Instagram

?

A post shared by Priya Prakash Varrier? (@priya.p.varrier) on

- Advertisement -

प्रियाची लोकप्रियता जास्त असल्यामुळे तिचे इन्स्टाग्राम ७४ लाख पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तसंच ती प्रमोशन करण्यासाठी आठ लाख रुपये घेते असं म्हटलं जातं आहे.


हेही वाचा – ‘तान्हाजी’ चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थ्याने मागितली सुट्टी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -