घरताज्या घडामोडी'मी हिंदूच आहे, पण..' आव्हाडांचे राम कदमांना प्रत्युत्तर

‘मी हिंदूच आहे, पण..’ आव्हाडांचे राम कदमांना प्रत्युत्तर

Subscribe

हिंदूच्या पुर्वजांचे अंत्यसंस्कार कुठेही होतात, त्यामुळे हिंदू आपल्या पुर्वजांबद्दल सांगू शकत नाही. पण मुस्लिम धर्मामध्ये त्यांचे हक्काचे कब्रस्तान असते, जिथे सर्व मुस्लिमांचे दफन केले जाते, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी येथे केले होते. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी आव्हाडांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील राम कदम यांना प्रत्युत्तर देणारे ट्विट केले आहे.

 

- Advertisement -
jitendra awhad tweet
जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मी हिंदूच आहे. हे कसे विसरू कि जात आडवी आली म्हणून माझ्या हो माझ्या आईला शेजारी पूजेला बोलवत नसत. आहो आमच्या बापजाद्यांना मंदिरात जाऊ दिले नाही. पाणवठ्या वर येऊ दिले नाही आणि हाक्काचे स्मशान पण दिले नाही. ते पण विशिष्ट लोकां साठी राखीव होते .. मग कळणार कसे कुठे झाले अंत्य संस्कार”

भिवंडी येथे CAA आणि NRC कायद्याच्या विरोधात बोलत असताना आव्हाड यांनी अंत्यसंस्काराचे विधान केले होते. एनआरसी कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम समाजासोबत दगाफटका होण्याची शक्यता आहे, तसेच ज्या समाजाला पाच हजार वर्ष दाबून ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत देखील दगा होऊ शकतो, असे वक्तव्य आव्हाड यांनी केले होते. ज्या जातींना आपल्या पुर्वजांचे अंत्यसंस्कार नेमके कोणत्या ठिकाणी झाले, हे माहीत नाही. ते आपले नागरिकत्व कसे काय सिद्ध करु शकतात, हे समजविण्यासाठी आव्हाड यांनी अंत्यसंस्काराचे विधान केले होते.

- Advertisement -

आमदार राम कदम यांनी मात जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, “मुस्लिम समाजाला खूश करण्याच्या नादात हिंदू धर्म आणि ज्या धर्मात दफनविधी होत नाही, त्या सर्व धर्मियांचा आव्हाड यांनी अपमान केला आहे. आव्हाड यांनी कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करावे, आमची कोणतीही हरकत नाही. मात्र हिंदू धर्माचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -