घरताज्या घडामोडीबांग्लादेशी समजून भारतीयांच्या झोपड्यांवर बुलडोझर

बांग्लादेशी समजून भारतीयांच्या झोपड्यांवर बुलडोझर

Subscribe

देशभरात सीएए आणि एनआरसीवरून तणावाचे वातावरण असतानाच कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमध्ये पोलीस व महापालिकेने बांग्लादेशी नागरिक समजून भारतीयांच्या झोपड्यांवरून बुलडोझर फिरवल्याचे समोर आले आहे. याप्रकरणावरून कर्नाटकमध्ये नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बंगळुरूमध्ये करियामन्ना अग्रहारा येथील वसाहतीमध्ये ३०० नागरिक राहतात. हे नागरिक बांग्लादेशी असून ते विनापरवाना राहत असल्याचे टि्वट व व्हिडीओ भाजप आमदार अरविंद लिंबावल्ली यांनी केले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस व महापालिकेने कसलीही शहानिशा न करता येथील झोपड्यांवर बुलडोझर फिरवत सर्व झोपड्या जमिनदोस्त केल्या. पण नंतर नागरिकांनी भारतीय असल्याचे पुरावे अधिकाऱ्यांना सादर केले. त्यात बहुतेक नागरिक हे आसाम, त्रिपुरा आणि उत्तर कर्नाटकमधील असल्याचे समोर आले. यासगळ्यांनी आधार कार्ड, पेन कार्ड आणि निवडणूक ओळख पत्र अधिकाऱ्यांना दाखवले तेव्हा मात्र अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. तर या गैरजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -