घरमहाराष्ट्रआंगणेवाडी जत्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या

आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या

Subscribe

येत्या १७ फेब्रुवारीला असलेल्या आंगणेवाडी जत्रेसाठी कोकण रेल्वेकडून तीन साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येतील. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून सावंतवाडी, थिविम, करमाळीसाठी विशेष एक्स्प्रेस सोडण्यात येणार आहेत.

एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस 14 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल. ही गाडी त्याचदिवशी दुपारी 12.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोडहून 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल. ही गाडी एलटीटीला दुसर्‍या दिवशी मध्यरात्री 12.20 वाजता पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकावर थांबा देण्यात येईल.

- Advertisement -

एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष एक्स्प्रेस 17 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून मध्यरात्री 1.10 वाजता सुटेल. ही गाडी त्याचदिवशी दुपारी 12.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी सावंतवाडी रोडहून 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सुटेल. ही गाडी एलटीटीला दुसर्‍या दिवशी रात्री 3.25 वाजता पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकावर थांबा देण्यात येईल.एलटीटी ते थिविम विशेष एक्स्प्रेस 14 फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री 8.45 वाजता सुटेल.

 ही गाडी दुसजया दिवशी सकाळी 7.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहचेल. तर, परतीच्या प्रवासासाठी थिविहून 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.55 वाजता सुटेल. ही गाडी एलटीटीला दुसजया दिवशी मध्यरात्री 12.20 वाजता पोहचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबा देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -