घरताज्या घडामोडीकाळबादेवी, गिरगावासीयांच्या मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसनाला चालना

काळबादेवी, गिरगावासीयांच्या मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसनाला चालना

Subscribe

पहिल्या कंत्राटदाराची एमएमआरसीकडून नेमणुक

कुलाबा वांद्रे सिप्झ मेट्रो ३ मार्गामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या जुन्या मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने आता एक पाऊल पुढे पडले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत आता गिरगाव आणि काळबादेवीवासीयांच्या पुर्नविकासासाठी कंत्राटदाराची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही भागातील लोकांचे नव्या घराचे बहुप्रतिक्षित विषय मार्गी लागणार आहे. एमएमआरसीने दिलेल्या कंत्राटामुळे आता जुन्या मुंबईतील रहिवाशांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

एमएमआरसीने वॅसकॉन इंजिनिअर्सला काळबादेवी येथील पुनर्विकासात ३८ मजल्याच्या टॉवर बांधण्याचे काम देण्यात आले आहे. हे काम दोन टप्प्यात पुर्ण करण्यात येणार आहे. या इमारतीत प्रत्येक माळ्यावर ९ फ्लॅट्स असतील. सरासरी ४०५ चौरस फुट ते ५५० चौरस फुट इतक्या आकाराचे प्रत्येक घर असणार आहे.

- Advertisement -

तिन्ही टॉवरमध्ये मिळून आतापर्यंतची शहरातील सर्वात मोठा पुनर्वसनाचा हा प्रकल्प असेल असे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे सरकारी पातळीवर वसवण्यात आलेला हा सर्वात मोठा असा प्रकल्प असणार आहे. मेट्रो ३ प्रकल्पामुळे गिरगाव, काळबादेवी यासारख्या परिसरातील भाग जोडले जाणार आहेत. यानिमित्ताने जुन्या मुंबईचा विकास होण्यासाठीही मदत होणार आहे.

५४ महिन्यात पहिला टॉवर पुर्ण होणार
गिरगाव आणि काळबादेवी या दोन्ही स्टेशनसाठी सरासरी १२०० चौरस मीटर इतकी जागा लागणार आहे. दोन्ही स्टेशनच्या ठिकाणच्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पण या मार्गावर सुरू असणाऱ्या इतर स्थानकांच्या तुलनेत याठिकाणी मात्र खूपच कमी वेगाने स्टेशन उभारणीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील या संपुर्ण इमारतीचे काम हे येत्या ५४ महिन्यात पुर्ण होणे अपेक्षित आहे. तर या कामासाठी एकुण १३१ कोटी रूपये इतका खर्च येणार आहे.

इतर दोन टॉवर्ससाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. या संपुर्ण पुनर्वसनाच्या प्रक्रियेत ४२३ रहिवासी तर २८९ वाणिज्यिक गाळ्यांचे पुनर्वसन होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -