घरताज्या घडामोडीCorona Virus : कोल्हापुरातून करोनाचा संशयित रुग्ण रुग्णालयातून पसार

Corona Virus : कोल्हापुरातून करोनाचा संशयित रुग्ण रुग्णालयातून पसार

Subscribe

करोनाचा संशय असलेला हा रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून पसार झाला आहे. या रुग्णाचे २८ वय आहे. तो दुबईहून भारतात परतला होता.

देशभरासह राज्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे करोनाचे संशयित रुग्ण हे रुग्णालयातून पलायन करून डॉक्टर आणि शासनाची चिंता वाढवत आहे. अशीच घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. कोल्हापुरात करोनाचा संशय असलेल्या एका रुग्णाने रुग्णालयातून पलायन केले आहे. करोनाचा संशय असलेला हा रुग्ण छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातून पसार झाला आहे. या रुग्णाचे २८ वय आहे. तो दुबईहून भारतात परतला होता. दरम्यान, तो आपली कागदपत्रे घेऊन रुग्णालयात आला. आणि जरा बाहेर जाऊन येतो असे सांगून रूग्णालयातून पसार झाला.

नागपुरातून एका महिलेचे पलायन

नागपूर मधून ही रुग्ण पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात होम क्वारनटाईन केलेली संशयित करोना बाधित महिला उत्तर प्रदेशातून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. ३५ वर्षीय ही महिला सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तिचे माहेर उत्तर प्रदेशमध्ये आहे. ती १५ मार्च रोजी शारजहा येथून नागपुरात आली होती. तिला होम क्वारनटाईन करण्यात आले होते.  मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सगळ्याना चुकवून ही महिला घरून निघून गेल्याचे सोमवारी पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी तिची सगळीकडे शोधा शोध केली. नातेवाईकांकडे विचारणा केली असता ती उत्तर प्रदेशात निघून गेल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -