घरCORONA UPDATECoronavirus Breaking: निजामुद्दीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मौलवीवर गुन्हा दाखल

Coronavirus Breaking: निजामुद्दीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या मौलवीवर गुन्हा दाखल

Subscribe

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात तबलीगी मरकज प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता कारवाई केली असून येथील धार्मिक सभा आयोजित करणाऱ्या मौलानाला ताब्यात घेतले आहे. या मौलानावर भारतीय दंड विधान कायद्यानुसार कलम २६९, २७०, २७१, १२० ब च्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. काही वेळापुर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला होता. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश देताना त्यांनी उपराज्यपाल यांना कारवाई संदर्भातली फाईल पाठवली होती. त्यानंतर लगेचच उपराज्यपाल यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

उपराज्यपाल यांचे आदेश मिळताच पोलिसांनी मौलान साद आणि तबलिगी जमातीच्या काही सदस्यांना संसर्गजन्य रोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करत तक्रार दाखल केली. पोलिसांचा आदेश झुगारून कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी मरकजच्या एका धार्मिक कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. तसेच काही परदेशी नागरिक देखील या कार्यक्रमात आले होते.

- Advertisement -

कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा या कार्यक्रमात २४ परदेशी नागरिक सहभागी झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर केंद्र सरकार खडबडून जागे होत, हा परिसर बंदिस्त करुन टाकला. येथील जवळपास ११०० लोकांना क्वारटाइंन केले गेले आहे. तर अनेक लोकांची चौकशी सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -