घरCORONA UPDATECoronaVirus: कोरोनामुळे डोंबिवलीतील महिलेचा मृत्यू!

CoronaVirus: कोरोनामुळे डोंबिवलीतील महिलेचा मृत्यू!

Subscribe

राज्यात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढता दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यात आणखी एक बळी गेला आहे. डोंबिवलीतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. ही मृत महिला ११ मार्चला ऑस्ट्रेलियाहून भारतात आली असल्याची माहिती आहे. त्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली. म्हणून ती दवाखान्यात गेली. त्यावेळेस डॉक्टरांनी तिला कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र तिने ही बाब लपवली आणि तिचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या बळीचा आकडा आता १२वर पोहोचला आहे. तसंच आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०२वर पोहोचला आहे.

देशभरात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. काल कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एक-एक कोरोनाचे रुग्ण आढळले होते. कल्याण मधील एका महिलेले तर डोंबिवली मधील एका लहान मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

त्यामुळे आता डोंबिवलीची परिस्थिती पाहता डोंबिवली पूर्ण परिसर पूर्णत: बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. डोंबिवली पूर्ण भागात कोरोना रुग्ण सापडले असल्याने पूर्व भागातील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी, आहिरे गाव, सहकारनगर, म्हात्रेनगर हे परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – CoronaVirus: पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -