घरमुंबईCoronaVirus: डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद - आयुक्त

CoronaVirus: डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद – आयुक्त

Subscribe

पूर्व भागातील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी, आहिरे गाव, सहकारनगर, म्हात्रेनगर हे परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णपणे बंद

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातल्याचे दिसून गेल्या दीड महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या अनेक देशांपासून सुरू होऊन भारतात देखील हातपाय पसरू लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी नागरिकांना कळकळीचे घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले जात आहे. असे असताना देखील एक डोंबिवलीकर करोनाबाधित तरूण हजारोंमध्ये फिरला असल्याने त्याने प्रशासनाची चिंता वाढली होती.

डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद करण्याचे आदेश

त्यानंतर कल्याण-डोंबिवली भागात मंगळवारी प्रत्येकी एक रूग्ण आढळल्याने डोंबिवलीकरांमध्ये अजून भितीचे वातावरण पसरले. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १० च्यावर पोहचल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील माहिती आयु्क्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

- Advertisement -

डोंबिवली पूर्ण भागात कोरोना रुग्ण सापडले असल्याने पूर्व भागातील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी, आहिरे गाव, सहकारनगर, म्हात्रेनगर हे परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, अन्यथा घरात सुरक्षितच रहा.. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं, संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

कोरोनामुळे डोंबिवलीतील महिलेचा मृत्यू!

राज्यात दिवसेंदिवस कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढता दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे राज्यात आणखी एक बळी गेला आहे. डोंबिवलीतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. ही मृत महिला ऑस्ट्रेलियाहून आली होती. तसंच तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या बळीचा आकडा आता १२वर पोहोचला आहे. तसंच आतापर्यंत राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३०२वर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -