घरक्रीडाCoronaVirus: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सुनील गावस्कर यांची ५९ लाखांची मदत!

CoronaVirus: कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सुनील गावस्कर यांची ५९ लाखांची मदत!

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. ७५ हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात देखील कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. म्हणून या कोरोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मंगळवारी ५९ लाखांची मदत केली आहे. तसंच सध्याच्या भारतीय संघाचे कसोटी तज्ज्ञ चेतेश्वर पुजारा यांनीही या कोरोनाच्या लढाईत भाग घेतला आहे.

सुनील गावस्कर यांनी पीएम रिलीफ फंडात ३५ लाख रुपये दिले आहेत. तर सीएमओ महाराष्ट्राच्या फंडमध्ये २४ लाख रुपये दिले आहेत. सुनील गावस्कर यांनी या योगदानाचा स्वतः खुलासा केलेला नाही. परंतु यासंदर्भात मुंबईचे माजी कर्णधार अमोल मुझुमदार यांनी ट्विट केलं आहे.

- Advertisement -

चेतेश्वर पुजारा यांनी कठीण परिस्थितीत निस्वार्थी सेवा करणारे डॉक्टर, पॅरा मेडिकल स्टाफ आणि पोलिसांसह सर्व अत्यावश्यक सेवामधील कर्माचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिलं की, मी आणि माझ्या कुटुंबियांनी पीएम कॅरस फंड आणि गुजरात सीएम रिलीफ फंडामध्ये मदत केली आहे. आशा आहे तुम्ही देखील करा.

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा, कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, आयपीएल स्टार सुरेश रैना, माजी अष्टपैलू युवराज सिंग, क्रिकेटर आणि खासदार गौतम गंभीर, गोलंदाज हरभजन सिंग आणि इतर अनेक क्रिकेटर्सने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मदत केली आहे.


हेही वाचा – कोरोनाशी लढण्यासाठी अझीम प्रेमजींनी १ हजार १२५ कोटींची केली मदत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -