घरमहाराष्ट्रनाशिककोरोनाशी लढण्यासाठी पालिका मुख्यालय प्रवेशव्दारावर अभय

कोरोनाशी लढण्यासाठी पालिका मुख्यालय प्रवेशव्दारावर अभय

Subscribe

नाशिक महापालिका मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनाच्या प्रवेशव्दारावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ’अभय’ नावाचे युमीफायर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे.

नाशिक महापालिका मुख्यालय अर्थात राजीव गांधी भवनाच्या प्रवेशव्दारावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ’अभय’ नावाचे युमीफायर प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. सॅनेटायझरचा फवारा या उपकरणाव्दारे मारला जात असला तरीही संबंधित व्यक्ती ओला होत नाही हे अभयचे वैशिष्ठ्य आहे.
महापालिकेच्या मुख्यालयात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने अभय’ युमीफायर हे आवश्यकते नुसार आर्द्रता निर्माण करणारे साधन बसवण्यात आलेले आहे. आतापर्यंत स्प्रिंकलर, शॉवरच्या माध्यमातून बाहेर पडणारे थेंबांचा आकार हा ८००ते ९०० मायक्रॉन इतका असल्याने त्यात व्यक्ती ओली होत असे. मात्र हे मशीन मिनिटाला १,७०,००० वेळा व्हायब्रेट होऊन सॅनिटायझरचे रूपांतर अवघ्या ३ मायक्रॉनच्या थेंबामध्ये होते. त्यामुळे आकाशात ज्याप्रमाणे ढग दिसतात त्याप्रमाणे वातावरण तयार होते. या वातावरणात व्यक्तीचा प्रवेश झाल्यानंतर ती पूर्णत: निर्जंतूक होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी याची मदत होणार आहे
हे उपकरण सात फूट उंच व चार फूट लांब आहे. तसेच तीन फूट रुंद आहे. ते पूर्णत: पारदर्शक आहे. प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी पारदर्शक असा पडदा आहे. हे ’अभय’ युमीफायर आरकीन व्हेंचर प्रा.लीचे संचालक सुरेश कापडिया यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आले आहे. त्याची पाहणी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत शहर अभियंता संजय घुगे,कार्यकारी अभियंता सी.बी.आहेर, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ सचिन हिरे उपस्थित होते.

आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे संकल्पनेला मूर्त स्वरूप आले. ’अभय’ नावाचे युमीफायर तयार करण्याची संकल्पना गेल्या पंधरा वीस दिवसांपासून होती. मात्र परवानगीच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यासाठी आयुक्तांशी संपर्क करून ही संकल्पना त्यांच्या समोर मांडली. त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्यांनी मला तातडीने परवानगी दिली. त्यामुळे या वेगळ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देऊ शकलो.
– सुरेश कपाडिया , संचालक, अभय युमीफायर आरकीन व्हेंचर

अभयमुळे शहरात प्रादुर्भाव टाळण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमतः या प्रकारचे युमीफायर तयार झाले आहे. शहरात १० युमीफायर लावण्याचा संकल्प असून त्यात रुग्णालयांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
-राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

कोरोनाशी लढण्यासाठी पालिका मुख्यालय प्रवेशव्दारावर अभय
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -