घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनाग्रस्तांमध्ये वरळी अडीचशे, तर भायखळा, नागपाडा शंभरी पार

Coronavirus : कोरोनाग्रस्तांमध्ये वरळी अडीचशे, तर भायखळा, नागपाडा शंभरी पार

Subscribe

कोरोनाग्रस्तांचा १० एप्रिलपर्यंतचा एकूण आकडा ९९३ वर पोहोचला आहे. तर त्याखालोखाल भायखळा, चिंचपोकळी, नागपाडा, मुंबई सेंट्रल या ‘ई’ विभागानेही कोरोनाग्रस्तांची शंभरी पार केली आहे.

मुंबईतील वरळी, प्रभादेवी या ‘जी-दक्षिण’ विभागातील कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतच चालला आहे. यात आता ४२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या २४३ वर पोहोचली आहे. मात्र, कोरोनाग्रस्तांचा १० एप्रिलपर्यंतचा एकूण आकडा ९९३ वर पोहोचला आहे. तर त्याखालोखाल भायखळा, चिंचपोकळी, नागपाडा, मुंबई सेंट्रल या ‘ई’ विभागानेही कोरोनाग्रस्तांची शंभरी पार केली आहे. या विभागात एकूण १०४ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील ‘जी-दक्षिण’ विभागात वरळी कोळीवाडापाठोपाठ जनता कॉलनीत सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. त्याशिवाय आदर्शनगर, बीडीडी चाळ, पोलीस वसाहत या विभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. वरळीतील जिजामाता नगर येथे आता रुग्णांची संख्या अधिक वाढल्याने येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा अडीचशेच्या जवळपास पोहोचला आहे. वरळीतील कोरोनाग्रस्तांवर पोद्दार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.

त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भायखळा, माझगाव, नागपाडा, चिंचपोकळी या ‘ई’ विभागाचा समावेश आहे. या विभागात झुला मैदान परिसरात महापालिकेने राबवलेल्या विशेष मोहिमेत २० हून अधिक रुग्ण आढळून आले आहे. या भागात रुग्ण आढळून येत असतानाच ई विभागाच्या सहायक आयुक्त अंडे यांना सोबत घेवून प्रभारी सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी शोध मोहिमही राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे या भागात रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. परंतु येथील परिस्थितीही पुढील आठवड्यापर्यंत नियंत्रणात आणली जाईल, असा विश्वास सहायक आयुक्तांनी व्यक्त केला.

- Advertisement -

तर तिसऱ्या क्रमांकावर ग्रँटरोड, मलबारहिल, वाळकेश्वर ‘डी’ विभागाचा समावेश आहे. या विभागात आतापर्यंत ६६ रुग्ण आढळून आले आहेत. वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या एच-पूर्वमध्ये (५९ रुग्ण), विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिममध्ये (५७ रुग्ण), देवनार, गोवंडी परिसरातील एम-पूर्व विभागात (४८ रुग्ण), विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के-पूर्वमध्ये (४५ रुग्ण), मालाड पी-उत्तर विभागामध्ये (३९ रुग्ण), भांडुप, कांजूरमार्ग, पवई, विक्रोळी या एस विभागात (३३ रुग्ण), कुर्ला एल विभागात (३१ रुग्ण), माहिम, दादर, धारावी या जी-उत्तर विभागात (३१ रुग्ण), कांदिवली आर-दक्षिण विभागात ( २८ रुग्ण), देवनार, चेंबूर या एम-पश्चिम विभागात ( २६ रुग्ण), वडाळा, शीव या एफ-उत्तर विभागात (२६ रुग्ण), वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच –पश्चिम विभागात (२५ रुग्ण), गोरेगाव या पी-दक्षिण विभागात ( २३ रुग्ण), बोरीवली आर-मध्य विभागात (२१ रुग्ण), घाटकोपर, विद्याविहार या एन विभागात ( २० रुग्ण), परळ, शिवडी, लालबाग या एफ-दक्षिण विभागात (१५ रुग्ण), मस्जिद बंदर, डोंगरी या बी विभागात (१४ रुग्ण), दहिसर या आर-उत्तर विभागात (१२ रुग्ण), चिराबाजार, चंदनवाडी, गिरगाव या सी विभागात (१० रुग्ण), कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट या ए विभागात (०९ रुग्ण) तर मुलुंड या टी विभागात (०८ रुग्ण) पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -