घरCORONA UPDATE#UddhavResign ट्रेंड ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये!

#UddhavResign ट्रेंड ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये!

Subscribe

कोरोनाविरोधात महाराष्ट्राची धुरा सांभाळणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आता राजीनाम्याची मागणी करणारा ट्रेंड ट्विटरवर गर्दी करू लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आणि विरोधात असे परस्पर विरोधी ट्रेंड यानिमित्ताने समोर आले आहेत. जवळपास ४० हजारांहून अधिक लोकांनी #UddhavResign हा हॅशटॅग वापरून ट्विट केले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नावेही ४० हजार नेटकरांनी ट्विटरवर ट्विट्स केले आहेत.

वांद्रे स्टेशनवर जमलेल्या गर्दीने ट्विटरकरांनी उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांना कोरोनाविरोधातील परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्यामुळे संपूर्ण व्यवस्थापन कोलमडल्याची टीका ट्विटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भाजप समर्थकांनीही हाच मुद्दा घेऊन दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनाही टार्गेट केले आहे. तर अनेक ट्विटर युजर्सने भाजपच्या या खालच्या पातळीच्या राजकारणाविरोधात टीका केली आहे. अनेक युजर्सने मुख्यमंत्र्यांचे कौतुक करत महाराष्ट्राचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने केल्यासाठी कौतुकही केले आहे.

- Advertisement -

राधिका पांडे या ट्विटर युजरने उद्धव ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांची तुलना करत दोघेही एकसारखच काम करत असल्याची टीका केली आहे. एक मुख्यमंत्री आनंद विहार तर एक मुख्यमंत्री वांद्रे येथून एकसारखच काम करत असल्याची टीका करत Brother from another mother असे म्हणत कमेंट केली आहे. आनंद कुमार या ट्विटर युजरने आदित्य ठाकरे यांची तुलना राहुल गांधी यांच्यासोबत करत हे घराणे शाहीतून आलेल बाळ आहे. भारतीयांना या राजकीय पप्पूंना वाचवण्याची गरज असल्याची कमेंट त्यांनी केली आहे. तर केंद्र सरकार अतिशय घाणेरडे राजकारण महाराष्ट्रात करत आहे. महाराष्ट्र सरकारविरोधात ही खेळी असल्याची टीकाही करण्यात आली आहे. अतुल गुप्ता या ट्विटर युजरने ट्विट केले आहे की तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहू इच्छिता तर #UddhavResign असलेले ट्विट रिट्विट करा असेही आवाहन करण्यात आले आहे. ट्विट करणाऱ्यांमध्ये अनेकजण हे भाजपचे समर्थक असल्याने त्यांच्याविरोधातही ट्विटर युजरने टीकेची झोड उडवली आहे. शिवसेना लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व गोष्टी सुस्थितीत ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीकाही ट्विटरवर करण्यात आली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनाही नेटकऱ्यांनी लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासूनच आणखी २४ तास ट्रेन सुरू कराव्यात अशी मागणी मजुरांच्या वतीने महाराष्ट्राकडून पंतप्रधानांना करण्यात आली होती. त्यामुळे मजुर आपल्या घरी जाऊ शकतील असेही सांगण्यात आले होते. या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठीचा रोडमॅप उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी नाकारली. या ट्विटनंतर आदित्य ठाकरे यांनाही ट्रोल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -