घरCORONA UPDATECoronavirus : चीनने वुहानच्या लॅबमध्ये तयार केला 'कोरोना व्हायरस' - अमेरिकेचा दावा

Coronavirus : चीनने वुहानच्या लॅबमध्ये तयार केला ‘कोरोना व्हायरस’ – अमेरिकेचा दावा

Subscribe

चीनी संशोधक अमेरिकेच्या संशोधकांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत हे दाखविण्यासाठी चीनने विशिष्ट हेतूने वुहानच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार केला.

चीननेच वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू विकसित केला आणि तिथूनच त्याचा जगभर संसर्ग झाला असावा, असा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेतील दूरचित्रवाणी फॉक्स न्यूजने गुरुवारी दावा केला की, चीनी संशोधक अमेरिकेच्या संशोधकांपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत हे दाखविण्यासाठी चीनने विशिष्ट हेतूने वुहानच्या लॅबमध्ये हा विषाणू तयार केला. चीनने हा विषाणू जैविक अस्त्र म्हणून नव्हे, तर जगाला आपली ताकद दाखविण्यासाठी निर्माण केला होता. कोरोनासारख्या घातक विषाणूंची आम्हाला अमेरिकेपेक्षा चांगली ओळख आहे. आणि त्यावर नियंत्रण ही ठेवता येते हे दर्शविण्याचा चीनने प्रयत्न केला.

चीनने जाणून बुजून कोरोना व्हायरस पसरवला

फॉक्स न्यूजने एका सूत्राचा हवाला देत म्हटले की, डॉक्टरांचे प्रयत्न आणि प्रारंभीच्या काळात या विषाणूवर लॅबमध्ये च नियंत्रण मिळविण्यासंबंधीच्या काही कागदपत्रांच्या अभ्यासावरून हे लक्षात येते की, वुहानच्या ज्या वेट मार्केट मधून कोरोनाचा प्रसार झाला असे मानण्यात येते, तेथे वटवाघलांची विक्रीच होत नाही. लॅबवर होणाऱ्या आरोपांना वेगळी दिशा देण्यासाठी चीनने जाणूनबुजून पसरवला.

- Advertisement -

विषाणू लॅबमध्ये तयार झालेला नाही – चीनचे उत्तर

वुहान येथील लॅबमधून जाणीवपूर्वक विषाणूचा प्रसार करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपानंतर गुरुवारी चीनने खुलासा केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन म्हणाले की, जगातील २० लाखाहून अधिक लोकांना बाधित करणारा कोरोना विषाणू हा लॅबमध्ये तयार झालेला नसल्याची खातरजमा जागतिक आरोग्य संघटनेने ही केली आहे.

चीनच्या लोप नूर या अणुचाचणी स्थळावर मागील वर्षी हालचाली दिसल्या

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी म्हटले की, चीनने सीटीबीटी कराराचे पालन करण्याचा दावा केला असतानाही गुप्तरित्या कमी शक्तीचा अणुस्फोट केल्याची शक्यता आहे. कोरोनामुळे आधीपासूनच बिघडलेले या दोन देशांचे संबंध या दाव्यानंतर अधिकच तणावपूर्ण होऊ शकतात. चीनच्या लोप नूर या अणुचाचणी स्थळावर मागील वर्षी मोठ्या प्रमाणात हालचाली दिसल्या होत्या. त्यामुळे अमेरिकेच्या मनात ही शंका आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -