घरCORONA UPDATECorona: मुंबईत कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात; पालिकेचा दावा

Corona: मुंबईत कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात; पालिकेचा दावा

Subscribe

मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या फिव्हर क्लिनिकमुळे सर्वाधिक लोकांची चाचणी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास मोठी मदत होत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २ हजाराच्या पुढे गेली आहे. मात्र पालिका प्रशासनाने कोरोना व्हायरस अजूनतरी सामुदायिक प्रसारापर्यंत पोहोचला नसल्याचे सांगत आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने हा दावा केला आहे की, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या जरी वाढत असली तरी अद्याप ते सामुदायिक प्रसारापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे मुंबईत कोरोना अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे. कारण सामुदायिक प्रसार हा तिसऱ्या टप्प्यात गेल्यावर होतो.

हेही वाचा – आज शाओमीचा रोबोट क्लिनर भारतात लाँच होणार

- Advertisement -

पालिकेचे शर्थीचे प्रयत्न 

पालिकेने मुंबईमध्ये ९७ फिव्हर क्लिनिकची सुविधा उपलब्ध केली आहे. या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार ५८५ लोकांची प्राथमिक चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९१२ लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांचे नमुने लॅबमध्ये चाचणीकरता पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ ५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पालिकेने सुरू केलेल्या फिव्हर क्लिनिकमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या चाचण्या होत असून त्यानंतर सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

‘कोरोना कोविड – १९’ या आजारास प्रभावी प्रतिबंध होण्यासाठी बाधित व्यक्तींचे निदान करून त्यांना लवकरात लवकर क्वारंटाईन करण्याच्या उद्देशाने पालिकेने स्वतः पुढाकार घेऊन बाधित रुग्णांची शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या फिव्हर क्लिनिक आणि काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली देशातील पहिली ‘दूरध्वनी’ हेल्पलाइन याच शोध मोहिमेचा एका भाग आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -