घरट्रेंडिंगया पाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहा फ्रीमध्ये वेबसिरीज

या पाच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहा फ्रीमध्ये वेबसिरीज

Subscribe

सध्या लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. दरम्यान वेबसीरिजची दुनिया अजूनच लोकप्रिय होत आहे. परंतु बऱ्याचदा अनेक वेबसिरीज पाहण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहे. मात्र असे काही ओटीटी प्लेटफॉर्म आहेत जिथे तुम्ही पैसे खर्च न करता वेबसिरीजचा आनंद लुटता येऊ शकतो.

कोणते ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत ते जाणून घ्या

१) युट्यूब 

- Advertisement -

वेबसिरीज आणि ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंगची सुरुवात गूगलने आपल्या युट्युब प्लॅटफॉर्म केली. युट्यूबवर पहिल्यांदा छोटे-छोटे व्हिडिओ टाकण्यात आले. त्यानंतर युट्युबवर पर्मनंट रूममेट्स यासारख्या शोची सुरुवात केली. डाइस मीडिया, लिटिल थिंग्स सारख्या सिरीज आल्या. आता देखील युट्यूबवर अनेक प्रकारच्या वेबसिरीज आहेत. यावर्षी ‘फ्लेम्स’ या वेबसिरीजचा नवीन सिझन युट्यूबवर आला आहे. त्यामुळे तुम्ही अनेक चांगल्या वेबसिरीज युट्यूब पैसे न खर्च करता पाहू शकता.

२) टीव्हीएफ प्ले 

- Advertisement -

द व्हायरल फीवर हे हळूहळू मोठे प्रोडक्शन हाऊस बनत आहे. सध्या टीव्हीएफ अॅमेझॉन प्राइमसाठी व्हिडिओ करताना दिसत आहे. हॉस्टेल डेज आणि पंचायत यासारख्या वेबसिरीज चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. याशिवाय अनेक वेबसिरीज टीव्हीएफ प्लेवर प्रदर्शित होताना दिसत आहेत. तसेच टीव्हीएफवर अनेक जुन्या वेबसिरीज देखील आहेत.

३) सोनी लाईव्ह 

२०१९मध्ये टीव्हीएफची वेबसिरीज गुल्लक प्रसिद्ध झाली. काही फेस्टिवलमध्ये ही वेबसिरीज गाजली होती. सोनी लाईव्हवर देखील ही वेबसिरीज उपलब्ध आहे. सोनी लाईव्हवर सोनी चॅनेलवरील टीव्ही शो देखील आहेत. या व्यतिरिक्त अनेक वेबसिरीज आणि चित्रपट देखील तुम्ही पाहू शकता.

४) एमएक्स प्लेअर 

एमएक्स प्लेअरवरील अनेक वेबसिरीज आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली एमएक्स प्लेअरवरील भौकाल ही वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याशिवाय थिंकिस्तान, फादर्स-२, फ्लेम्स सीझन २, पवन अँड पूजा यारसारख्या वेबसिरीज एमएक्स प्लेअरवर उपलब्ध आहेत. तसेच हिंदी आणि इंग्लिशमधील अनेक चित्रपट देखील येथे उपलब्ध आहेत.

५) हॉटस्टार 

हॉटस्टार आणि डिस्ने प्लस आता एकत्र आले आहेत. हॉटस्टारवर सबस्क्रिप्शन न करता देखील खूप काही तुम्ही येथे पाहू शकता. हॉटस्टावरील प्लन सिस्टम वेगळ्या आहेत. प्रिमियर आणि व्हीआयपी असे दोन प्रकार तुम्हाला हॉटस्टारवर दिसतील. मात्र अशा परिस्थिती देखील तुम्ही येथे फ्रीमध्ये अनेक चित्रपट आणि वेबसिरीज पाहू शकता.


हेही वाचा – Lockdown: खुशखबर! एका वर्षात नोकरी गेली तर कंपनी भरणार कारचा ईएमआय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -