घरदेश-विदेशकरूणानिधींच्या तब्येतीमध्ये सुधारणा;रूग्णालयाची माहिती

करूणानिधींच्या तब्येतीमध्ये सुधारणा;रूग्णालयाची माहिती

Subscribe

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत असल्याची माहिती कावेरी रूग्णालयाने दिली आहे. लघवीच्या वाटेवर संसर्ग झाल्याने शनिवारी एम. करूणानिधी यांना कावेरी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि DMKचे सर्वेसर्वा एम. करूणानिधी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे. रूग्णालयाने त्यासंदर्भातील माहिती आता प्रसिद्ध केली आहे. लघवीच्या वाटेवर संसर्ग झाल्याने शनिवारी एम. करूणानिधी यांना कावेरी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मिळताच हजारोंच्या संख्येने समर्थकांनी रूग्णालयाच्या बाहेर गर्दी केली होती. पण त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याने आता रूग्णालयाने स्पष्ट केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आता कावेरी रूग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. करूणानिधी यांनी ५ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. आजारपणामुळे मागील वर्षभरापासून करूणानिधी यांनी कार्यकर्त्यांशी कोणताही संवाद साधलेला नाही. त्यानंतर तब्येत बिघडल्याने करूणानिधी यांना शनिवारी कावेरी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

दिग्गज एम. करूणानिधींच्या भेटीला

दरम्यान, एम. करूणानिधी यांच्या आजारपणाविषयी माहिती मिळताच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी रविवारी कावेरी रूग्णालयामध्ये जाऊन करूणानिधी यांची भेट घेतली. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल देखील त्याठिकाणी हजर होते. तसेच मुख्यमंत्री ओ. पनीरस्वामी यांनी देखील करूणानिधी यांच्या तब्येतीची रूग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली. तर, अभिनेता आणि राजकारणात उतरलेल्या कमल हसन यांनी देखील करूणानिधी यांच्या तब्येतीची रूग्णालयामध्ये जाऊन चौकशी केली. करूणानिधी यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मिळताच हजारो कार्यकर्ते रूग्णालयाबाहेर गोळा झाले होते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. यावेळी रूग्णालयाने करूणानिधी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती दिली. त्यानंतर कावेरी रूग्णालयाबाहेरची गर्दी कमी व्हायला सुरूवात झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -