घरताज्या घडामोडीCoronavirus: जगात ६० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण!

Coronavirus: जगात ६० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण!

Subscribe

जगातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा विषाणूचा प्रसार झाला आहे. गेल्या २४ तासांत एक लाख २५ हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार हजार ८६९ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगात ६० लाखांहून अधिक जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यापैकी तीन लाख ६६ हजार ४१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्याचबरोबर २६ लाख ५६ हजारांहून अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृतांचा आकडा अमेरिकेचा आहे. अमेरिकेत जवळपास १७ लाखांहून अधिक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्रिटनमध्ये झाले आहेत. पण ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा रशिया, स्पेन आणि ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. यानंतर इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्की, इराण आणि भारत या देशांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

जगातील एकूण १२ देशांमध्ये कोरोना एक लाखांहून अधिक रुग्ण आहेत. रशिया, ब्राझील, स्पेन, ब्रिटन, इटली या देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांहून अधिक आहे. या देशांव्यतिरिक्त सहा देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. अमेरिकेच्या व्यतिरिक्त ब्राझील आणि रशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

जगातील या १० देशांमध्ये कोरोना विषाणू सर्वाधिक फैलाव

अमेरिका – १, ७४५, ५३० कोरोनाबाधित – १०४,५४२ मृत्यू
ब्राझील – ४६८,३३८ कोरोनाबाधित – २७,९४४ मृत्यू
रशिया – ३८७,६२३ कोरोनाबाधित – ४, ३७४ मृत्यू
स्पेन – २८५,६४४ कोरोनाबाधित – २७, १२१ मृत्यू
ब्रिटन – २७१,२२२ कोरोनाबाधित – ३८,१६१ मृत्यू
इटली – २३२,२४८ कोरोनाबाधित – ३३,२२९ मृत्यू
फ्रान्स – १८६,८३५ कोरोनाबाधित, २८,७१४ मृत्यू
जर्मनी – १८३,०१९ कोरोनाबाधित – ८,५९४ मृत्यू
भारत – १,७३,७६३ कोरोनाबाधित – ४,९७१ मृत्यू 
तुर्की – १६२,१२० कोरोनाबाधित – ४, ४८९ मृत्यू

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,९६४ नवे रुग्ण!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -